नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण

एपीएमसी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण (Corona patient in apmc market) झाली आहे. व्यापाऱ्यााला कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण

नवी मुंबई : एपीएमसी मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण (Corona patient in apmc market) झाली आहे. व्यापाऱ्यााला कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसेच बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यामध्ये भीतीचे (Corona patient in apmc market) वातावरण आहे.

देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी बंद असलेले एपीएमसी मार्केट सुरु करण्यात आले होते. मार्केट सुरु झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गर्दी निर्माण झाली होती. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केटच्या गेटवर जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला होता. या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझर लाऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा. सदर सुचनेचे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीबतवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं ठळकपणे सूचनेत नमूद करण्यात आलं होते.

बाजारातील गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी प्रशासनाकडून रोज नवनवीन उपाययोजना सुरु करण्यात आल्या होत्या. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहनही केले होते. पण गर्दी कमी होत नसल्याने हा बाजार खारघर येथे हलवण्यात येणार असल्याचेही एपीएमसी प्रशासनाने सांगितले होते.

दरम्यान, नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 30 वर पोहोचली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. तसेच राज्यातही एक हजाराच्यावर कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *