Vasai Corona : वसई, विरार, नालासोपाऱ्यात कोरोना रुग्णांचा आकडा 1600 पार

वसई, विरार, नालासोपाऱ्यात कोरोना कोरोना रुग्णांनी 1600 चा आकडा पार केला (Corona Patient increase Vasai) आहे.

Vasai Corona : वसई, विरार, नालासोपाऱ्यात कोरोना रुग्णांचा आकडा 1600 पार

वसई : वसई, विरार, नालासोपाऱ्यात कोरोना रुग्णांनी 1600 चा आकडा पार केला (Corona Patient increase Vasai) आहे. सातत्याने वसई, विरार, नालासोपाऱ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल (16 जून) 24 तासात 97 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1680 वर पोहोचली (Corona Patient increase Vasai) आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात काल 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यासोबत एका दिवसात 65 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात आतापर्यंत 63 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर 866 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 751 जणांवर उपचार सुरू आहेत.

नव्या रुग्णांमध्ये 23 जणांना ताप, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यासोबत 62 रुग्ण हे हायरिस्क संपर्कातील आहेत. इतर रुग्णांमध्ये 1 रेल्वे कर्मचारी, 1 गरोदर माता, 1 पोलीस कर्मचारी, 1 डॉक्टर, 1 वाहनचालक, 1 इलेक्ट्रिशिअन, 1 परिचारिकेचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 1 लाख 13 हजार 445 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 5 हजार 537 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 57 हजार 851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 50 हजार 44 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 13 हजारांवर

Pune Corona Recovery | पुणे विभागात आतापर्यंत 10 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त

मीरा भाईंदरमध्ये दोन नवे कोव्हिड रुग्णालय, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 819 पदांची भरती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *