सातारा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, अशा सूचना सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांत आता संचारबंदी लागू करण्यात येत आहे. साताऱ्यातही कोरोनाचा पुढील धोका विचारात घेऊन जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आलीय. या संचारबंदीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना वगळण्यात आलेय. (Corona Virus Curfew In Satara From 11 Pm To 6 Am)
सध्या लग्नसराई आणि शाळांमध्ये सोशल डिस्टन्स पाळला जात आहे का? यासाठी पोलिसांची फिरती गस्त पथके तैनात करण्यात आली आहेत. यापुढील काळात राजकीय कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले असून, यामध्ये सोशल डिस्टन्स तसेच 50 व्यक्तींची मर्यादा करण्यात आलीय. 1 मार्चपर्यंत यात परिस्थितीनुसार बदल केले जाणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
मागील काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून येथील प्रशासन सतर्क झाले आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार फक्त सातारा जिल्ह्यापर्यंतच सीमित राहीला नाहिये. मान, खटाव, कोरेगाव अशा तालुक्यांतसुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या तालुक्यांत कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार झाले आहेत. या तालुक्यातील एका गावातील चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. पुण्यातील विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसतेय. त्यामुळे राज्य सरकार, तसेच आरोग्य विभागाने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी हे नियम पाळले नाहीत, तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असे सूतोवाच सरकारमधील अनेक मंत्र्यांनी केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. दरम्यान आगामी काळात कोरोना रुग्णांमध्ये अशाच प्रकारे वाढ झाली तर प्रशानस कठोर निर्णय घेऊ शकते.
इतर बातम्या :
साताऱ्यात नवा कोरोना विषाणू, अनेक तालुके कोरोना हॉटस्पॉट, प्रशासन अलर्टवर
Corona Virus Curfew In Satara From 11 Pm To 6 Am