धडकी भरवणारी आकडेवारी! राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 398 जणांचा मृत्यू

राज्यात आज 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. राज्यात आजमितीस एकूण 6,38,034 एकूण रुग्ण सक्रिय असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37,03,584 झालीय. Corona virus maharashtra corona positive

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:38 PM, 16 Apr 2021
धडकी भरवणारी आकडेवारी! राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 398 जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update

मुंबईः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आलीय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच काही बंद करण्यात आलंय. विशेष म्हणजे तरीही राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत नाहीये. राज्यात आज 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Corona Positive) आढळलेत. राज्यात आजमितीस एकूण 6,38,034 एकूण रुग्ण सक्रिय असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37,03,584 झालीय. ( Corona virus In the maharashtra today 63,729 new corona positive, 398 people died)

तर राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय

राज्यात आज 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय. तसेच राज्यात आज 45,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झालेय. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत, तर सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

नागपुरातील हनुमान नगर झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण

नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे प्रशासन चांगलंच हादरलं असून, आता नागपुरात पूर्वीप्रमाणे कंटेन्मेंट झोन तयार करायला सुरुवात केलीय. सुरुवातीच्या काळात संपूर्ण वस्ती कंटेन्मेंट झोन होत होती. पाच लोक पॉझिटिव्ह आल्यास बिल्डिंग सील केली जायची, 20 लोकं एकाच वस्तीत असल्यास तेवढा भाग सील करायचा. मात्र आता वाढती रुग्ण संख्या बघता पुन्हा कंटेन्मेंट झोन तयार व्हायला लागले असून, त्याची संख्या आता शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपुरातील हनुमान नगर झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत असल्यानं कंटेन्मेंट झोनसुद्धा वाढले आहेत.

यवतमाळमध्ये कोरोनाचा वाढता धोका

यवतमाळमध्ये कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यात पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण वाढतंय, त्यात मृत्यूचंही प्रमाण वाढत चाललंय. पॉझिटिव्ह झाल्यावर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी वेटिंग आणि मृत्यूनंतर सरणावर वेटिंग ही अवस्था सध्या यवतमाळमध्ये आहे. आज तब्बल 27 मृत्यू झालेत, त्यातले 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत, उर्वरित मृतदेहांवर टप्याटप्याने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

उस्मानाबादेत स्मशानभूमीही गहिवरली! एकावेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, 8 मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत

VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट, उस्मानाबादेत मनाला चटका लावणारं दृश्य

Corona virus In the maharashtra today 63,729 new corona positive, 398 people died