औरंगाबादमधील 10 हजार पगाराची नोकरी गेली, बुलडाण्याला परतला, आता महिनाकाठी 80 हजाराची कमाई

रितेश देशमुख यांनीही महेश कापसे या चित्रकाराचं कौतुक केले आहे. विशेष म्हणजे आता तो दरमहा सुमारे 80 हजार रुपये कमावत आहे.

औरंगाबादमधील 10 हजार पगाराची नोकरी गेली, बुलडाण्याला परतला, आता महिनाकाठी 80 हजाराची कमाई

मुंबईः लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे ठप्प असल्यानं अनेकांना नोकरीवर पाणी सोडावं लागलंय. नोकरी गमावल्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावतो आहे. लॉकडाऊनच्या आधी असाच एक तरुण महिन्याला 10 हजार रुपये कमावत होता. परंतु लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावल्यानंतर आता तो 80 हजार रुपये कमावतो आहे. लॉकडाऊनमध्ये मिळणाऱ्या मोकळ्या वेळेनं त्याचे आयुष्यच बदलले. व्यवसायाने चित्रकलेचे शिक्षक असलेल्या महेश कापसे यांनी आपली चित्र सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्यांची चित्रं एवढी लोकप्रिय झाली की, चित्रपटातील कलाकारही या चित्रकारांचे चाहते बनले. रितेश देशमुख यांनीही महेश कापसे या चित्रकाराचं कौतुक केले आहे. विशेष म्हणजे आता तो दरमहा सुमारे 80 हजार रुपये कमावत आहे. ( artist mahesh kapse earning 80 thousand per month)

मार्च-एप्रिलपूर्वी महेश कापसे यांना फारसं कोणी ओळखत नव्हतं. ते महाराष्ट्रातील औरंगाबादमधील एका शाळेत चित्रकलेचे शिक्षक होते. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि काही दिवसांनंतर कापसे यांना शाळेची नोकरी गमवावी लागली. महेश कापसेही बुलडाण्यातील गावी परतले. महेश यांना त्या काळात बराच मोकळा वेळ मिळत होता. त्या मोकळ्या वेळेत त्यांनी चित्र काढण्याची स्वतःची आवड जोपासली. तसेच ती चित्रे टिकटॉकवर टाकण्याचीही योजना आखली. त्यांच्या मनात विचार आला की, आपली चित्रे टिकटॉकवर का टाकू नये आणि त्यानंतर महेशचे आयुष्यच बदलले. हळूहळू महेश कापसे सामान्य लोकांमध्येही लोकप्रिय होऊ लागले. सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या कलेचे चाहते बनले. महेश यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळू लागली. क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन यांनी त्यांचा व्हिडीओदेखील शेअर केला. बड्या मराठी कलाकारांनाही त्यांचं कौतुक केलं.


महेश सांगतात की, मी माझ्याबरोबर कर्तव्य बजावणा-यांची चित्रं बनवण्याचा विचार केला आणि पाहता पाहता बर्‍याच ऑर्डर येऊ लागल्या. एका दिवसात 2-2, 3-3 ऑर्डर येऊ लागल्या. आता महेश यांना महिन्याकाठी 40 पर्यंत ऑर्डर मिळतात आणि तसेच एका चित्रासाठी ते 2 हजार रुपये घेतात, तर पेंटिंग्ज बनवण्यास फक्त 10 मिनिटे लागतात. महेश यांची आजी पार्वती सांगतात की, तो माझा नातू आहे, त्यानं वाखाणण्याजोगी प्रगती केली आहे. तो पेंटिंग्ज बनवतो. चित्रकलेत त्याला मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळत आहेत. माझा नातू एवढा मोठा होईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता.

महेश यशवंतराव कला महाविद्यालयाच्या आर्ट क्लासमध्ये नेहमीच प्रथम आले होते, परंतु त्यांची कौशल्याला आता ओळख मिळाली आहे. तीसुद्धा लॉकडाऊन काळात. टिकटॉक बंद झाल्याने महेशच्या कामावर परिणाम झाला. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरवरून ते चित्रं विकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनचा फटका, रावणाचा पुतळा बनवणाऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट

लॉकडाऊनमध्ये कोकणातील तरुणाचा आधुनिक शेतीचा निर्णय, माळरानावर काजू लागवड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *