धोका वाढला! राज्यात आज नव्यानं 9,855 रुग्ण सापडले

सरकारही नियमांची कडक अंमलबजावणी करत आहे. विशेष म्हणजे आज राज्यात 9,855 नवे रुग्ण सापडल्यानं खळबळ उडालीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:32 PM, 3 Mar 2021
धोका वाढला! राज्यात आज नव्यानं 9,855 रुग्ण सापडले
corona virus news

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवरही मास्क घालणे, सामाजिक अंतर यांसारखे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येतेय. सरकारही नियमांची कडक अंमलबजावणी करत आहे. विशेष म्हणजे आज राज्यात 9,855 नवे कोरोना रुग्ण सापडल्यानं खळबळ उडालीय. (Corona Virus News Today, 9,855 New Patients Were Found In The State)

राज्यात नव्याने 9,855 नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात नव्याने 9,855 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 42 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.40 % एवढा आहे. राज्यात आज 6559 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, राज्यात आजपर्यंत एकूण 20,43,349 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.77% एवढे झालेय. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,65,09,506 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21,79,185 (13.20 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 3,60,500 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 3,701 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज एकूण 82,343 ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात आज एकूण 82,343 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 9,855 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 21,79,185 झालीय. राज्यात कोरोना लसीकरणालाही जोरदार सुरुवात झालीय.

खासगी रुग्णालयात 250 रुपये प्रतिडोस आकारणार

कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरणाचा दुसरा टप्पा राबवला जात आहे. या टप्प्यात 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल. तसेच 60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य केले जाणार आहे. तर खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी प्रत्येक डोससाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

महापालिकेची कोविड लसीकरण केंद्र

1. बी.के.सी जंबो रुग्णालय, वांद्रे

2. मुलुंड जंबो कोविड रुग्णालय, मुलुंड

3. नेस्को जंबो कोविड रुग्णालय, गोरेगाव

4. सेवन हिल्स रुग्णालय, अंधेरी

5. दहिसर जंबो रुग्णालय, दहीसर

60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल तर तर ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

‘ही’ कागदपत्रे लागतील

कोरोना लसीसाठी आधार नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड, मनरेगा ज़ब कार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेन्शन डॉक्युमेंट, MP/MLA/MLA चं आयडी कार्ड, सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस आयडी कार्ड, नॅशनल पोप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड यापैकी कोणतीही माहिती तुम्ही दाखवू शकता.

संबंधित बातम्या : 

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा, नोंदणी कशी करावी?, लस कोठे मिळणार?, अनेक अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं

Co-Win registration : कोरोना लसीसाठी को विन अॅपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Corona Virus News Today, 9,855 New Patients Were Found In The State