Coronavirus Impact: महाराष्ट्रात बार आणि दारूची दुकाने बंद, होम डिलिव्हरी चालू, जाणून घ्या

दररोज रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत दिल्लीत सर्व काही बंद राहील. ही बंदीची कारवाई 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:59 PM, 7 Apr 2021
Coronavirus Impact: महाराष्ट्रात बार आणि दारूची दुकाने बंद, होम डिलिव्हरी चालू, जाणून घ्या

नवी दिल्लीः दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असून, अनेक खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणीही केली जातेय. राज्य सरकारच्या वतीने रात्रीच्या कर्फ्यूबरोबर अनेक कडक निर्बंध लागू केले गेलेत. दिल्लीतील नाईट कर्फ्यू आणि महाराष्ट्रातील कर्फ्यूसह शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. दररोज रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत दिल्लीत सर्व काही बंद राहील. ही बंदीची कारवाई 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. (Coronavirus Impact: Bars and liquor shops closed in Maharashtra, home delivery on, find out)

महाराष्ट्रात व्यावसायिक आस्थापनंही बंद ठेवण्याची घोषणा

दुसरीकडे महाराष्ट्रानेही व्यावसायिक आस्थापनंही बंद ठेवण्याची घोषणा केलीय. त्यामध्ये बार आणि दारूच्या दुकानांचा समावेश आहे. दिल्लीतील दारूची दुकाने रात्री 10 वाजता बंद होत आहेत. त्यामुळे कर्फ्यूचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु महाराष्ट्र सरकारने रात्री सर्व प्रकारच्या दारू विक्रीवर बंदी घातली आहे.

सर्व प्रकारच्या बार आणि दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार

पुढील आदेश येईपर्यंत शहरे आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या बार आणि दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितलेय. सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात कोणत्याही मद्याचे उत्पादन विकू दिले जाणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत घाऊक किंवा किरकोळ दारूची विक्री बंद राहील. या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणार्‍यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. अल्कोहोल निर्मितीवर कोणतेही बंधन घालण्यात येणार नाही आणि मद्य कारखाना पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, उत्पादन युनिटमध्ये काम करणाऱ्या लोकांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल आणि सामाजिक अंतरावर लक्ष दिले जाईल.

शाळा-महाविद्यालय बंद

महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी किंवा पार्सल डिलिव्हरीबाबत आतापर्यंत कोणतेही नवीन नियम जाहीर केलेले नाहीत. गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान दारूची जास्त मागणी पाहता ऑनलाईन वितरण सुविधा देण्यात आली होती. महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग वर्ग बंद करण्यात आलेत. सर्व धार्मिक स्थळे, बार आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याची घोषणा केली गेलीय. सलून, ब्युटी पार्लर, स्पा, सिनेमा हॉल आणि नाटक थिएटरही बंद असतील. करमणूक पार्क, आर्केड वॉटर पार्क, सर्व अनावश्यक दुकाने, क्लब, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासह सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मॉल, दुकाने आणि मार्केट-हॉल बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सूट देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सूट होती

गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान घरात दारूच्या डिलिव्हरीसाठी सूट होती. फोनवरून दारू मागविण्याची सुविधा देण्यात आली. नंतर ते ऑनलाईनही झाले. आयएमएफएल, बिअर आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना परमिट धारकांच्या घरी मद्यप्राशन करण्याची परवानगी होती. टोकन सुविधा निश्चित कालावधीसाठी पुणे आणि नाशिक येथे सुरू केली गेली होती. पुणे आणि नाशिकमधील घाऊक विक्रेत्यांनी मोबाईल अ‍ॅप तयार केले होते, ज्याद्वारे लोकांना ऑनलाईन टोकन मिळू शकत होते. टोकन नंबर मिळाल्यानंतर लोकांना त्यांचा स्टॉक एका निश्चित कालावधीत मिळू शकेल. फोनद्वारे लोकांना दारूचा टोकन नंबरही मिळू शकत होता.

संबंधित बातम्या

LIC च्या ‘या’ योजनेत 23000 पेन्शन मिळवण्यासाठी जमा करा 3 लाख, 10 वर्षांनंतर पैसेसुद्धा परत मिळणार

पोस्टात 2850 रुपये जमा करा आणि 20 वर्षांनंतर मिळवा 14 लाख, नेमकी योजना काय?

Coronavirus Impact: Bars and liquor shops closed in Maharashtra, home delivery on, find out