बदलापूर पालिकेचं कोव्हिड ICU 4 महिन्यांनंतर अखेर सुरू, tv9 च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग

गेल्या 4 महिन्यांपासून हा विभाग बंद असल्यानं शहरातील गंभीर रुग्णांची उपचारांसाठी फरपट होत होती. ही बाब टीव्ही 9 मराठीनं समोर आणली होती.

  • निनाद करमरकर, टीव्ही 9 मराठी, बदलापूर
  • Published On - 22:23 PM, 30 Mar 2021
बदलापूर पालिकेचं कोव्हिड ICU 4 महिन्यांनंतर अखेर सुरू, tv9 च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
प्रातिनिधिक फोटो

बदलापूर: पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमधील आयसीयू विभाग अखेर सुरू करण्यात आलाय. गेल्या 4 महिन्यांपासून हा विभाग बंद असल्यानं शहरातील गंभीर रुग्णांची उपचारांसाठी फरपट होत होती. ही बाब टीव्ही 9 मराठीनं समोर आणली होती. यानंतर अखेर हे आयसीयू पुन्हा सुरू करण्यात आलंय. (Covid ICU of Badlapur Municipality finally started after 4 months, wake up the administration after the news of TV9 marathi)

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना शहरातच मोफत उपचार उपलब्ध

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना शहरातच मोफत उपचार उपलब्ध व्हावेत, या हेतूने ऑक्टोबर महिन्यात बदलापूर पश्चिमेच्या गौरी सभागृहात कुळगाव बदलापूर नगरपालिकेने आयसीयू विभाग सुरू केला होता. मात्र गेल्या 4 महिन्यांपासून हा विभाग बंद होता. त्यामुळे बदलापूर शहरातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना खर्चिक खासगी उपचारांसाठी जावं लागत होतं.

बदलापूर नगरपालिकेने ICU विभाग सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली

याबाबतची बातमी टीव्ही 9 मराठीने प्रसारीत केल्यानंतर त्याची दखल घेत बदलापूर नगरपालिकेने हा आयसीयू विभाग सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आणि तातडीनं सोपस्कार पूर्ण करत अखेर आज (मंगळवारी) हा आयसीयू विभाग पुन्हा सुरू झाला. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या आयसीयूत 12 रुग्ण दाखल झालेत. त्यामुळे आता बदलापूर शहरातील गंभीर रुग्णांना शहरातच मोफत उपचार घेता येणार आहेत.

प्रशासनाच्या अनास्थेमुळे होता आयसीयू विभाग बंद

मात्र अवघ्या चारच महिन्यात पालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा आयसीयू विभाग बंद पडला होता. 13 फेब्रुवारी रोजी या आयसीयूतील शेवटचा रुग्ण ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला होता. त्यामुळे बदलापूर शहरात उपलब्ध असलेली पालिकेची आयसीयू विभागाची व्यवस्था आता ठप्प झाली होती.

रुग्णसंख्या वाढत असतानाच शहरातला पालिकेचा आयसीयू विभाग बंद

एकीकडे पुन्हा एकदा बदलापुरात रुग्णसंख्या वाढत असतानाच शहरातला पालिकेचा आयसीयू विभाग बंद केल्याने पालिका प्रशासनावर संताप व्यक्त होतोय. शहरात आतापर्यंत स्वागत कमानी, चौक सुशोभीकरण, कला नसलेली दालनं अशा दुय्यम गोष्टींसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पालिकेने आरोग्यासारख्या अतिमहत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करण्यास हात आखडता घेतल्यानं शहरात नाराजी व्यक्त होते होती.

संबंधित बातम्या

राज्यात कोरोनाचा आकडा वाढला, महाराष्ट्रात कुठे कुठे संचारबंदी?

धोका वाढला! राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 नवे रुग्ण सापडले

Covid ICU of Badlapur Municipality finally started after 4 months, wake up the administration after the news of TV9 marathi