VIDEO | ठाण्यात क्रेनचा ब्रेक फेल, महापालिका शाळेच्या भिंतीवर धडक

क्रेनची स्टिअरिंग जाम झाल्यामुळे ती ठाणे महानगर पालिकेच्या गायमुख येथील शाळेच्या भिंतीवर जाऊन आदळली. (Crain hits Thane Municipal School)

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 8:12 AM, 24 Feb 2021
VIDEO | ठाण्यात क्रेनचा ब्रेक फेल, महापालिका शाळेच्या भिंतीवर धडक
ठाण्यात क्रेन शाळेच्या कम्पाऊण्ड वॉलवर धडकली

ठाणे : ब्रेक फेल होऊन क्रेन ठाणे महापालिका शाळेच्या कम्पाऊण्ड भिंतीवर आदळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात घोडबंदर रोडवरील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कुठलाही विद्यार्थी, शिक्षक अथवा अन्य कोणीही दुखापतग्रस्त झालेलं नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Crain hits Thane Municipal School after break fail on Ghodbunder Road)

अवजड क्रेन घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरातून जात होती. अचानक क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे क्रेनवरील नियंत्रण सुटले. क्रेनची स्टिअरिंग जाम झाल्यामुळे ती ठाणे महानगर पालिकेच्या गायमुख येथील शाळेच्या भिंतीवर जाऊन आदळली.

अपघातात शाळेच्या भिंतीचे नुकसान 

या अपघातात शाळेच्या भिंतीचे आणि शाळेच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेन चालकावर कारवाई केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु पालिकेच्या शाळेचे नुकसान झाले आहे.

पाहा व्हिडीओ :

अंधेरीत मेट्रोची क्रेन कोसळून झालेला अपघात

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या क्रेनचा भीषण अपघात झाला होता. यात बस स्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. मेट्रोची क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे येथे नेली जात होती. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात क्रेनचे दोन तुकडे झाले. बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या अंगावर त्या क्रेनचा एक भाग कोसळला. त्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. (Crain hits Thane Municipal School after break fail on Ghodbunder Road)

आंबोलीतही ऑक्टोबरमध्ये क्रेन अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑक्टोबर महिन्यात गॅस टँकर आणि क्रेनचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

संबंधित बातम्या :

मुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात, क्रेन अंगावर पडून महिलेचा मृत्यू

आंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

(Crain hits Thane Municipal School after break fail on Ghodbunder Road)