पत्नी आणि मुलांनी गोठ्यात बांधून ठेवलं, दोन दिवसांनी वृद्धाचा जागेवरच मृत्यू

पत्नी आणि मुलांनी गोठ्यात बांधून ठेवलं, दोन दिवसांनी वृद्धाचा जागेवरच मृत्यू

रत्नागिरी : कौटुंबिक वादातून वृद्ध वडिलांना त्यांच्या मुलांनी आणि पत्नीने गोठ्यात बांधून ठेवल्याने दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात घडली आहे. जन्मदात्या बापालाच या पद्धतीने छळल्यामुळे या मुलाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय.

वेळंब घाडेवाडी येथील रहिवासी सखाराम घाडे यांना दारूचं व्यसन होतं. ते पत्नी, मुले आणि सुना तसेच शेजाऱ्यांनाही त्रास द्यायचे, असं म्हटलं जातं. त्यामुळे वडिलांच्या या त्रासाला मुलांसह पत्नी कंटाळली होती. याचवेळी शिमगोत्सवात पालखीसाठी त्यांची दोन मुलं गावी आली होती. या काळात वडिलांचा त्रास पुन्हा सुरू झाला. वडिलांना वारंवार समजावूनही ते ऐकत नाहीत, त्यामुळे दोन्ही मुले त्रस्त झाली होती.

वैतागून अखेर दोन मुले, पत्नी अशा तिघांनी रविवारी सखाराम यांना हात-पाय आणि मानेजवळ दोरखंडाने आवळून गोठ्यात बांधून ठेवलं. सोमवारी रात्री मुलं मुंबईला निघून गेले. मंगळवारी सकाळी पत्नीने गोठ्यातून आवाज येत नाही म्हणून कानोसा घेतला असता सखाराम हे मृतावस्थेत आढळून आले. शेजाऱ्यांना बोलावून त्यांनी मृतदेह घरात आणला. यानंतर गावात या मृत्यूबाबत चर्चा सुरू झाली. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. त्या नंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी मुलांची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविताच मुलाने मृत्यू कशामुळे झाला हे सांगितलं. या प्रकरणी दोघा मुलांसह पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *