LIVE : मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस

  • Updated On - 5:01 pm, Sat, 7 September 19
LIVE : मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस

[svt-event title=”राज ठाकरेंना डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीचा फटका” date=”07/09/2019,4:17PM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा फटका, राज यांचा ताफा पाऊण तास ट्रॅफिकमध्ये अडकला [/svt-event]

[svt-event title=”ठाणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात” date=”07/09/2019,3:56PM” class=”svt-cd-green” ] #ठाणे – ठाणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात, सखल भागात पाणी साचायला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा वाढला” date=”07/09/2019,3:52PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला, राधानगरी धरणाचा बंद झालेला आणखी एक दरवाजा उघडला, चार स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू, पंचगंगा नदी 37 फुटांवर, आंबेवाडी, प्रयाग चिखली येथील लोकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली. घरगुती गणपतीचे लवकर विसर्जन करून लोक प्रशासनाच्या सूचनेकडे लक्ष ठेऊन, 4 राज्य मार्ग आणि 15 जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत” date=”07/09/2019,3:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस” date=”07/09/2019,3:03PM” class=”svt-cd-green” ] मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सुमारे दोन तासापासून मुसळधार सरी [/svt-event]

[svt-event title=”करूळ घाटात दरड कोसळली” date=”07/09/2019,3:01PM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग- करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ महत्वाचा घाट. भुईबावडा घाटातून वाहतूक वळविली [/svt-event]

[svt-event title=”मिलिंद देवरा यांना अध्यक्षपदावरुन हटवणे योग्यच : संजय निरुपम” date=”07/09/2019,11:55AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांना काढून मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिलिंद देवरा यांच्या जागी एकनाथ गायकवाड यांना मुंबई काँग्रेसची सूत्र देण्यात आली आहेत. निवडणूक तोंडावर आली तरी काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. मिलिंद देवरा यांना अध्यक्षपदावरुन काढण्याचा निर्णय अतिशय योग्य. देवरा जबाबदारी पाडण्यात अपयशी, निरुपम यांचा टोला [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर” date=”07/09/2019,11:26AM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय डोंबिवली दौऱ्यावर, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार,विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज यांच्या दौऱ्याला महत्व, निवडणुकीआधी राज यांचा पहिलाच औपचारिक दौरा [/svt-event]

[svt-event title=”कॉम्रेड सुधीर ढवळे यांची साक्ष ” date=”07/09/2019,11:17AM” class=”svt-cd-green” ] पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे आज कॉम्रेड सुधीर ढवळे यांची साक्ष होणार.  काही वेळातच येरवडा कारागृहातून कॉम्रेड ढवळे पोलीस बंदोबस्तात चौकशी आयोगासमोर हजर होणार. शुक्रवारी अड. सुरेंद्र गडलिंग यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर करण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन खटल्यावर परिणाम होण्याच्या शक्यतेने त्यांनी साक्ष देण्यास नकार दिला. आयोगाचे प्रमुख कोलकता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल, आणि सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर चौकशी सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक – भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर” date=”07/09/2019,11:18AM” class=”svt-cd-green” ] नाशिक – भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. भाजप गटनेत्याचा महापौर आणि आमदारांना घरचा आहेर. भाजप आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांची लाय डिटेक्टर चाचणी करण्याची भाजप गटनेते जगदीश पाटील यांची मागणी. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने आरक्षण बदलाच्या मंजुर केलेल्या ठरावात बदल केल्याचा आरोप. आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी ECf माजी सभागृह नेते संभाजी मोरुस्कर यांच्या दबावातून परस्पर बदल झाल्याचा आरोप. भाजपच्याच गटनेत्यांसह चार नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार. [/svt-event]

[svt-event title=”कोकणात मुसळधार पाऊस” date=”07/09/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना पहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. सिंधुदूर्ग जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम आहे. कोकणात पावसाचा सलग सातवा दिवस आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या वेळी दाखल झालेला पाऊस आता गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी सुद्धा पहायला मिळतोय. ८ सष्टेंबरपर्यत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. [/svt-event]

[svt-event title=”पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल ” date=”07/09/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ] पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरूच. पंचगंगेची पाणीपातळी 36.5 फुटांवर. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद. मात्र तीन दरवाजांमधून अद्याप विसर्ग सुरूच. रात्री उशीरा एनडीआरएफ टीम कोल्हापुरात दाखल [/svt-event]