पाणी टंचाई जीवावर, कोरड्या विहिरीत गुदमरुन दोघांचा मृत्यू

पाणी टंचाई जीवावर, कोरड्या विहिरीत गुदमरुन दोघांचा मृत्यू

बुलडाणा : साफसफाई करण्यासाठी कोरड्या विहिरीत उतरलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुलडाणामधील जामोद येथे घडली. तब्बल 11 तासांनी संबंधितांचे मृतदेह काढण्यात बचावर पथकाला यश आले. या घटनेतील तिसऱ्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.

जामोद तालुक्यात भीषण पाणीटंचाई असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कोरड्या विहिरींची साफसफाई करून त्याचे खोदकाम केल्यावर पाणी लागेल असे वाघमारे कुटुंबीयांना वाटले. त्यासाठी त्यांनी घरासमोरील विहिरीत साफसफाई करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला या विहिरीत प्रतिक वाघमारे उतरला. मात्र जीव गुदमरल्याने त्याने त्याच्या काकांना आवाज दिला. यावेळी विजय वाघमारे त्याला काढण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र तेही बाहेर आले नाही म्हणून दोघांना काढण्यासाठी मिलिंद वाघमारे खाली उतरले. यावेळी त्यांनी प्रतिक वाघमारेला दोरीने बांधून बाहेर काढले. त्यानंतर ते विजय वाघमारेंना काढायला खाली उतरले.

बराच काळ होऊनही मिलिंद वाघमारे आणि विजय वाघमारे दोघेही विहिरीतून बाहेर आले नाही. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करून दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, ग्रामस्थांचे प्रयत्न अयशस्वी झाले. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलानेही प्रयत्न केले, मात्र त्यांनाही अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले नाही. अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन पथकाला बोलावून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी या पथकाने  अथक परिश्रमानंतर दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झालेला होता. या घटनेमुळे जामोद ग्रामस्थांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित विहीर 60 फुट खोल आणि 3 फुट रुंद

संबंधित विहीर कोरडी असून अंदाजे 60 फुट खोल आणि 3 फुट रुंदी असल्याची  माहिती पथकाने दिली. यावेळी पथकाने जम्बो ऑक्सीजन सिलेंडरला 12 एम.एम. ट्युबनळी लावून आतमध्ये सोडली आणि खाली उतरून बचावाचे प्रयत्न केले. साफसफाई करण्यासाठी आदल्या दिवशी विहिरीतील कचरा जाळण्यात आला होता. त्यामुळे  त्यात गॅस तयार झाला. याच कारणाने विहिरीत उतरल्यानंतर संबंधितांचा जीव गुदमरल्याचे सांगितले जात आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *