मुंबईतील विक्रोळीत भरधाव टँकरने फूटपाथवर झोपलेल्या मजूरांना चिरडलं

विक्रोळीमध्ये टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे एक मोठा अपघात घडला. चालकाने फूटपाथवर झोपलेल्या मजूरांच्या अंगावर टँकर घातल्याने यात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला.

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 23:42 PM, 8 Jun 2019

मुंबई: विक्रोळीमध्ये टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे एक मोठा अपघात घडला. चालकाने फूटपाथवर झोपलेल्या मजूरांच्या अंगावर टँकर घातल्याने यात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. एका अन्य महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

विक्रोळीतील कैलास कॉम्प्लेक्स रोडवर एका टँकरने दुसऱ्या टँकरला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे तेथे उभ्या असलेल्या 5 ते 6 टँकरची आपआपसात टक्कर झाली. दरम्यान त्यातील एका टँकरने फूटपाथवर झोपलेल्या 4 मजूरांना चिरडले. यात 2 महिला मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष जखमी झाले. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती केले आहे.

बातमी लिहूपर्यंत मृतांची नावे समजू शकलेली नाही. मृतांमध्ये कामगारांचा समावेश आहे. दुर्घटना घडल्यानंतर चालक आणि क्लिनर फरार आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैंध पार्किंग केली जाते. याची अनेकदा तक्रारही केली जाते. मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे अशा अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.