निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दरम्यान निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. अशोक पांडुरंग सूर्यवंशी असे या मृत निवडणूक कर्मचाऱ्याचे नाव आहे. अहमदनगर सावेडी निवडणूक कार्यालयात बांधकाम विभागातील अशोक पांडुरंग सूर्यवंशी हे निवडणूक ड्युटीवर कार्यरत होते. सूर्यवंशी यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सकाळी सावेडी …

निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दरम्यान निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. अशोक पांडुरंग सूर्यवंशी असे या मृत निवडणूक कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अहमदनगर सावेडी निवडणूक कार्यालयात बांधकाम विभागातील अशोक पांडुरंग सूर्यवंशी हे निवडणूक ड्युटीवर कार्यरत होते. सूर्यवंशी यांची प्रकृती ठीक नसल्याने ते सकाळी सावेडी परिसरातील मतदान कार्यालयाच्या पायऱ्यांवर झोपलेले होते. बराच वेळ ते अशाच अवस्थेत झोपले असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही आहे, हे लक्षात येताच तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना बोलवले. यावेळी सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

अहमदनगर महापालिका निवडणूक

अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. या दरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवले जाऊ नये, धमकावले जाऊ नये, पुढील काळात पैसे वाटप होऊ नये, यासाठी आता प्रभागनिहाय एकूण 23 पथके तैनात करण्यात आली आहेत. कुणी उमेदवार मतदारांना प्रलोभन दाखवत असल्यास तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांना त्यावर तक्रार करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी होईपर्यंत शहरात ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील प्रमुख ८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

73 इमारतीत 367 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील केडगाव, सारसनगर आणि मुकुंदनगर येथील 11 इमारतीतील 41 केंद्र अतिसंवेदनशील आहेत, तर 137 संवेदनशील आहेत. त्यामुळे पोलिसांनीही चोख बंदोबस्त लावला आहे. या सर्व निवडणुकीवर व्हिडीओ कॅमेरा सोबतच ड्रोन कॅमेरानेही नजर ठेवली जाणार आहे.

निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 आहे.

अहमदनगरमध्ये कुठल्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?

• भाजप – 68
• शिवसेना – 64
• राष्ट्रवादी-काँग्रेस – 64
• मनसे – 14
• बसपा – 9
• आप – 8
• कम्युनिस्ट पार्टी – 3
• समाजवादी पक्ष – 4
• रासप – 4
• भारिप- बहुजन – 1
• अपक्ष – 106
• एकूण – 339

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *