महाराष्ट्राची धाकधूक वाढली, परभणीच्या सेलूतील ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूनेच

महाराष्ट्राची धाकधूक वाढली, परभणीच्या सेलूतील 'त्या' कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूनेच

देशभरात बर्ड फ्लूने थैमान घालायला सुरुवात केलीय. महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने पाय पसरण्यास सुरुवात केलीय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 16, 2021 | 2:05 AM

परभणी : देशभरात बर्ड फ्लूने थैमान घालायला सुरुवात केलीय. महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने पाय पसरण्यास सुरुवात केलीय. नुकतेच परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. तपासणीनंतर या सर्व कोंबड्या बर्ड फ्ल्यूने मेल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता परभणीच्याच सेलू तालुक्यातही अशाप्रकारे मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचा अहवाल समोर आलाय. परभणी जिल्हा प्रशासनानेच याबाबत माहिती दिलीय (Death of Chickens In Selu Parbhani due to Bird Flu).

सेलू गावात यापूर्वीच संचारबंदी लावण्यात आली आहे. 10 किमी परिसरातील कोंबड्यांची खरेदी विक्री आणि आवागमनास मज्जाव करण्यात आलाय. आता कुपटा गाव परिसरातील एक किलोमीटरमधील जिवंत कोंबड्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करण्यात येणार असण्याची माहिती सेलूचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिलीये.

कुपटा गावात यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. 5-6 दिवसांपूर्वी कुपटा येथील मोहन जाधव आणि समाधान दुधवडे या 2 शेतकऱ्यांच्या शेकडो कोंबड्या अज्ञात रोगाने मृत पावल्या होत्या. 3 दिवसांपूर्वी त्याचा अहवाल पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता.

आता त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सदर कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे परभणी जिल्ह्यावरील बर्ड फ्ल्यूच संकट टळलं नसून कायम आहे. बर्ड फ्ल्यू आल्याने अगोदरच परभणी जिल्ह्यात कुकुट पालन व्यवसायावर आभाळ कोसळंय. चिकनची मागणी घटली असून चिकनचे भाव 30 टक्यांनी घटलेत.

बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 3,596 पक्ष्यांचा मृत्यू

दरम्यान, राज्यात आधीच कोरोनाने कहर केलेला असताना आता बर्ड फ्लूची भीती पसरतेय (Bird Flu Update). आतापर्यंत राज्यात बर्ड फ्लू या विषाणूमुळे तब्बल 3 हजार 596 पक्षांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याबाबत संपूर्ण माहिती दिली.

“बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 3 हजार 596 पक्षांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोंबड्या, कावळे आणि बागळ्यांचा समावेश आहे. जिथं बर्ड फ्लूमुळे पक्षांचे मृत्यू झाले आहेत, त्याठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. शक्यता वाटल्यास कंट्रोल ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कायद्यानुसार सर्व अधिकार दिलेत”, अशी माहिती आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली.

तसेच, “आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर फेस्टिव्हलचं आयोजन करावं. आज पशूसंवर्धन आयुक्तालयात चिकन अंडी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. बर्ड फ्ल्यूचं संक्रमण माणसांत नाही. आत्तापर्यंत त्याचं एकही उदाहरण नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चिकन, अंडी बिनधास्त खाऊ शकता

“चिकन किंवा अंडी शिजवलेले किंवा बॉइल केले तर बर्ड फ्ल्यूचं व्हायरस पसरत नाही. चिकन, अंडी बिनधास्त खाऊ शकता. पोल्ट्री व्यवसायिकांचं सहकार्य चांगलं मिळतंय. ज्यांचं नुकसान होतंय त्यांना नुकसान भरपाई मिळणार, शासनाने नियमावली केली आहे”, असं म्हणत त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला आहे (Bird Flu Update).

“पक्षी अभयारण्य ज्या ठिकाणी आहे, त्यासाठी फॉरेस्ट विभाग अलर्ट आहे. आर्थिक फटका किती बसला याचा अजूनही अंदाज नाही”, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्राचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरलाय

“70 डिग्रीवर चिकन, अंडी शिजवावे, त्यात कुठलाही व्हायरस टिकत नाही. एक किलोमीटरच्या आत एखादा बर्ड फ्ल्यूचा व्हायरसमुळे पक्षी मृत आढळला, तर त्या परिसरात असलेल्या पोल्ट्रीतील पक्षी मारले जाईलच, याबाबत केंद्राचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरलाय”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 3,596 पक्ष्यांचा मृत्यू, अनेक ठिकाणी दहा किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन : पशुसंवर्धन विभाग आयुक्त

Bird Flu | बर्ड फ्लूचा प्रभाव, अंड्यांचे भाव पुन्हा घसरले! देशभरातील पोल्ट्री व्यासायिक अडचणीत

Bird Flu | ‘बर्ड फ्लू’ दरम्यान ‘चिकन’ खाणे किती धोकादायक? ‘या’ गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे!

Death of Chickens In Selu Parbhani due to Bird Flu

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें