उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली होती. मात्र अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. (Deputy CM Ajit Pawar hospitalised)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. अजित पवारांनी शनिवारी 18 ऑक्टोबरला अतिवृष्टी झालेल्या बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यातील एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्यानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलल्याची माहिती आहे.

अजितदादांची प्रकृती अत्यंत ठणठणीत चिंता करण्याचं कारण नाही- अमोल मिटकरी

अजितदादांची प्रकृती अत्यंत ठणठणीत आहे. काल विजयादशमीच्या शुभेच्छा देतानाही आमचा संवाद झाला होता. तेव्हाही दादांची तब्येत ठणठणीत असल्याचं मला जाणवलं. सकाळपासून कामाचा व्याप, लोकांशी संवाद या सगळ्या धकाधकीच्या व्यापामुळे थोडंसं अस्वस्थ वाटलं असणार. ते विलगीकरणात स्वतःच्या घरामध्येच होते. आता रुटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात गेल्याचं मला कळलं. मात्र कुठेही घाबरून जाण्याचं आणि चिंता करण्याचं कारण नाही. अजितदादा ठणठणीत आहेत आणि लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या : 

अजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

ये दादा का स्टाईल है! बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका! 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *