Corona | धुळ्यात लसीकरणासाठी कोवीन सॉफ्टवेअरचा वापर; काय आहे हे सॉफ्टवेअर?

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारत देशात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. धुळे जिल्यातही नियोजन केले जात आहे. (corona vaccination covin software)

Corona | धुळ्यात लसीकरणासाठी कोवीन सॉफ्टवेअरचा वापर; काय आहे हे सॉफ्टवेअर?
कोरोना लस प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 4:14 PM

धुळे : अवघ्या जगाला हादरवून सोडणार्‍या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारतासह इतर राष्ट्रांतही लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. धुळे जिल्यातही प्रशासनाकडून लसीकरणासाठी योग्य ते नियोजन केले जात आहे. (detailed plan of corona vaccination programme of Dhule and covin software)

येत्या काही आठवड्यांमध्ये कोरोनावरील लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात सूक्ष्म नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता आहे. तर धुळ्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ होऊ नये यासाठी कोविन सॉफ्टवेअरमध्ये नाव नोंदणी करून घेतली जात आहे. पुढे याच सॉफ्टवेअरद्वारे मोबाईलवर मेसेज पाठवून संबंधित व्यक्तीला त्या-त्या लसीकरण केंद्रावर बोलावले जाईल. त्यांनतर तेथे नाव नोंदणीची खात्री केल्यानंतरच त्या व्यक्तीला लस देण्यात येणार आहे.

धुळ्यात लसीकरणाचा मेगाप्लॅन

जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची रुपरेषा आखण्यात येत आहे. त्यासाठी लसीकरणाच्या नियोजनासाठीची पहिली बैठकही घेण्यात आली. मिळालेल्या माहितीप्रमाणे धुळ्यात 4 व्हॅक्सिनेशन ऑफिसर आणि 1 व्हॅक्सिनेटर यांच्या माध्यमातूनच लसीकरण केंद्रात लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य सेवकांना आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जात आहे. हे प्रशिक्षण युद्धपातळीवर सुरु असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.(detailed plan of corona vaccination programme of Dhule and covin software)

पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस

कोरोना काळात फ्रन्टवर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आरोग्यसेवकांना सर्वांत आधी लस देण्यात येणार आहे. तसे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचा त्यात समावेश असणार आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनाही कोरोना लस सर्वांत आधी समावेश असेल.

  • दुसऱ्या टप्प्यात पोलीस कर्मचारी, जवान, यांना लस देण्यात येईल.
  • तिसऱ्या टप्प्यात  पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे
  • चौथ्या टप्प्यात  पन्नास वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या कॅन्सर, डायबिटीज या व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना लस देण्यात येईल.
  • जिल्ह्यात एकूण 9 हजार 100 कोरोना रुग्णांना टप्प्याटप्याने  लस दिली जाणार आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात कोरोनाला थोपवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी कोवीन या सॉफ्टवेअरची मदत घेण्यात येणार आहे. लसीकरणाचा कार्यक्रम राबवताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडू नये हा यामागचा उद्देश आहे. (detailed plan of corona vaccination programme of Dhule and covin software)

कोवीन सॉफ्टवेअर काय आहे?

देशात सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक अशा विविध कंपन्यांना कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्राच्या आरोग्य विभागाकडे परवानगी मागितलेली आहे. देशभारत कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ उडू नये. तसेच, लसीकरणाचा क्रम ठरवण्यासाठी निश्चित असा आराखडा तयार असणे गरजेचे आहे. त्यासाठी कोवीन या सॉफ्टवेअरची मदत घेण्यात येणार आहे.

कोवीन सॉफ्टवेअर (CoVin- COVID-19 Vaccine Intelligence Network) हे केंद्र सरकारकडून विकसित करण्यात आलेले सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये लसीची खरेदी, लसीचे वितरण, लसीची साठवणूक या सर्व गोष्टींची तांत्रिक माहिती असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातली सर्व राज्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती याच सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याचे केंद्र सरकारकडून विविध राज्यांना सांगण्यात आलेले आहे.

तेलंगणा, राजस्थानमध्ये प्रायोगिक तत्वावर चाचणी

दरम्यान, राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांत कोवीन सॉफ्टवेअरचा प्रायोगिक तत्वावर उपयोग करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिलेली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ज्या व्यक्तीली लस द्यायची आहे; त्या व्यक्तीला लसीकरणाचे टिकाण, वेळ तसेच इतर माहिती पाठवण्यात येईल. तसेच लसीकरण झाल्यानंतर व्यक्तीला प्रमाणपत्रही दिले जाईल. ज्यामध्ये लसीकरणासंबंधी सविस्तर माहिती असेल.

(detailed plan of corona vaccination programme of Dhule and covin software)

संबंधित बातम्या :

‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

(detailed plan of corona vaccination programme of Dhule and covin software)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.