भरसभेत गाय आल्याने तारांबळ, फडणवीस म्हणाले मला गायीचा आशीर्वाद

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज धुळ्यातील नरढणा येथे जाहीर सभा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी संबोधित केलं.

Devendra Fadnavis Dhule rally, भरसभेत गाय आल्याने तारांबळ, फडणवीस म्हणाले मला गायीचा आशीर्वाद

धुळे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज धुळ्यातील नरढणा येथे जाहीर सभा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Dhule rally) संबोधित केलं. यावेळी नरढणा येथील सभेत गाय आल्याने किरकोळ धावपळ झाली. त्यावर फडणवीस यांनी “मला गायीचा आशीर्वाद मिळणार आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. जनादेशाचा अपमान केला आहे. शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला” असा हल्लाबोल केला.

2019 मध्ये विधानसभा आणि लोकसभा अशा 2 निवडणुका झाल्या. यामध्ये जनतेने भाजपला पसंती दिली. देशाचा इतिहास सांगतो बेईमानीने स्थापन झालेलं सरकार 7 महिन्यांच्या वर चालत नाही. सत्य परेशान होता है पराजित नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिरपूर पॅटर्न माहीत होता, परंतु आपण निवडणुकीत बिनविरोध निवडून येणारा शिरपूर पॅटर्न अशी देखील ओळख झाली आहे.

नंदुरबारमधील सभेतही महाविकास आघाडीवर हल्लाबोल

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील सभेपूर्वी नंदुरबारमध्येही जाहीर सभा घेत, महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. “शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला. आपण पराभूत केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना गेली आणि सरकार स्थापन केलं. हे सरकार जनादेशाचं सरकार नाही. आता आलेलं सरकार हे विश्वासघाताचं सरकार आहे. जनादेशाचा विश्वासघात करुन सरकार स्थापन करणारं हे देशाच्या इतिहासामधील पहिलं सरकार आहे’, असा घणाघात भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis slams shiv sena) यांनी केला. नंदूरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नंदूरबारमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis slams shiv sena) बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *