रेशन धान्य ते तब्लिगींवरील कारवाई, फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे तीन मागण्या

(Devendra Fadnavis Three Demands to Uddhav Thackeray over Corona Pandemic)

रेशन धान्य ते तब्लिगींवरील कारवाई, फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे तीन मागण्या

मुंबई : रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्या, ‘कोरोना’ विरोधात प्रत्यक्ष लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्ससाठी महत्त्वाची साधनसामग्री तात्काळ उपलब्ध करा आणि तब्लिगी संदर्भात कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कारवाई करा, अशा तीन मागण्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केल्या आहेत. (Devendra Fadnavis Three Demands to Uddhav Thackeray over Corona Pandemic)

राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी 90 टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. 16 राज्यांनी रेशनकार्ड नसतानाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्याचे धान्य त्वरित उपलब्ध करुन द्यावे. शिधापत्रिका नसल्यास आधार कार्ड प्रमाण मानावे, तेही नसल्यास यादी तयार करुन प्रमाणित करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबईतील रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनाची कमतरता असल्याचं समोर येत आहेत. त्यांनाही कोरोना रोगाने ग्रासल्याने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री स्वतः ड्रायव्हिंग सीटवर, मास्क बांधून मंत्रिमंडळाच्या बैठकीला रवाना

तब्लिकमधून आलेले अनेक जण महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये गेले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित नागरिक आणि त्यांच्या संपर्कात आलेले इतर संशयित यांच्याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई करा. भारतातील कोरोनग्रस्तांच्या यादीत ही संख्या मोठी असल्याने कडक कारवाई करा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

(Devendra Fadnavis Three Demands to Uddhav Thackeray over Corona Pandemic)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *