शिवाचार्य महाराजांची प्रकृती उत्तम, भक्तांकडून सदेह समाधीची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी

शिवाचार्य महाराज यांच्या भक्तांनी महाराजांच्या सदेह समाधीची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे (Dr Shivalinga Shivacharya Maharaj Samadhi Rumors).

  • राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड
  • Published On - 8:15 AM, 29 Aug 2020
शिवाचार्य महाराजांची प्रकृती उत्तम, भक्तांकडून सदेह समाधीची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नांदेड : डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांच्या आश्रमाकडून देण्यात आली आहे (Dr Shivalinga Shivacharya Maharaj Samadhi Rumors). त्यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवाचार्य महाराज 104 वर्षांचे आहेत. त्यांचे देशभरात भक्त आहेत. मात्र, शुक्रवारी (28 ऑगस्ट) त्यांच्या जिवंत समाधीच्या अफवेनंतर त्यांच्या अहमदपूर येथील आश्रमात कोरोना संसर्गाचा धोका असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आता त्यांच्या भक्तांकडून शिवाचार्य महाराज सदेह समाधी घेण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी घेणार असल्याच्या अफवेतून शुक्रवारी मोठी गर्दी उसळली होती. यानंतर त्यांच्या आश्रमाकडून शिवाचार्य महाराज समाधी घेणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्यांच्या लातूरमधील आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या गर्दीने शारीरिक अंतराचा निकष अगदी पायदळी तुडवला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीतीही वाढली.

लातुरात आतापर्यंत 7 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडालाच मात्र, काही भक्तांनी मास्क न लावल्याने काहीशी काळजी व्यक्त केली जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाजूला सारुन भक्तांनी गर्दी केल्याने  आरोग्याचा मोठा प्रश्न तयार झाला होता. आता मात्र भक्तांनी महाराजांच्या समाधीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

डॉ शिवलिंग शिवाचार्य हे लिंगायत समाजाचे धर्मगुरु आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हते, तर राज्याबाहेरही शिवाचार्य महाराज यांना मानणारा मोठा भक्तगण आहे. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वय 104 वर्षे असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेण्याची अफवा, लातुरात भक्तांची तोबा गर्दी

Dr Shivalinga Shivacharya Maharaj Samadhi Rumors