सगळ्यांचा हिशोब होणार, सूद समेत वापस करेंगे : धनंजय मुंडे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरात येऊन विविध विकासकामांचं उद्घाटन केले. यावेळी काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवले आणि निषेध व्यक्त केला. अत्यंत अहिंसेच्या मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला सोलापूर पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अक्षरश: गुंडगिरीचं दर्शन देत आंदोलकांना लाथा-बुक्क्यांनी झोडपून काढले. शांततेत काळे झेंडे दाखवून निषेध …

सगळ्यांचा हिशोब होणार, सूद समेत वापस करेंगे : धनंजय मुंडे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरात येऊन विविध विकासकामांचं उद्घाटन केले. यावेळी काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवले आणि निषेध व्यक्त केला. अत्यंत अहिंसेच्या मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला सोलापूर पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अक्षरश: गुंडगिरीचं दर्शन देत आंदोलकांना लाथा-बुक्क्यांनी झोडपून काढले. शांततेत काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणाऱ्या आंदोलकांना झोडपून काढणाऱ्या पोलिस प्रशासनावर आता सर्वच स्तरातून टीका होते आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. “सगळ्यांचा हिशोब होणार, सूद समेत वापस करेंगे” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पोलिस प्रशासनासह राज्य सरकारला इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले?

“हिटलरचा जिथे विरोध व्हायचा तिथे अशीच मुस्कटदाबी केली जात होती. शेवटी हुकूमशाहीचा अंत झालाच. जनता आता असा तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करणार नाही. या सगळ्याचा हिशोब होणारच, सूद समेत वापस करेंगे. परिवर्तन होणारच.”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सोलापुरातील या प्रकारावरुन पोलिस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, मारहाण करणाऱ्या पोलिसांनी निलंबित केलं गेलं नाही, तर सोलापुरात जाऊन आंदोलन करेन, असा इशाराच विखे पाटील यांनी दिला आहे.

विखे पाटील काय म्हणाले?

“मोदींसमोर निदर्शने केली म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असते तर समजू शकलो असतो. पण त्यांना अमानुष पद्धतीने लाथांनी तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करणारे पोलीस निलंबित झाले नाही तर मी सोलापुरात जाऊन आंदोलन करेल.”. असा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.

VIDEO : सोलापुरात नेमके काय घडले?

संबंधित बातम्या :

सुरुवात मराठीत, भाषण हिंदीत, शेवट कन्नड, मोदींच्या भाषणाने नेते अवाक्

भूमीपूजन आणि उद्घाटन आम्हीच करतो, दिखाव्यासाठी काही नसतं : मोदी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *