'पदवीधर' टी स्टॉलवर धनंजय मुंडे प्यायले 2 हजार रुपयांचा चहा

बीड : पदव्युत्तर शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळाली नसल्याने बीडच्या एका सुशिक्षित तरुणाने बीडच्या शासकीय विश्रामगृहासमोर ‘पदवीधर’ नावानेच चहाचा हातगाडा टाकला आहे. याच चहाच्या हात गाड्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा ताफा पोहचला आणि पदवीधर मुलाने बनवून दिलेल्या चहाचा घोट घेत चर्चा केली. एवढेच नाही तर धनंजय मुंडेंनी प्यायलेल्या चहाचे 2000 रुपये देखील दिले. नितीन धुताडमल या युवकाने समाजशास्त्र …

dhananjay munde, ‘पदवीधर’ टी स्टॉलवर धनंजय मुंडे प्यायले 2 हजार रुपयांचा चहा

बीड : पदव्युत्तर शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळाली नसल्याने बीडच्या एका सुशिक्षित तरुणाने बीडच्या शासकीय विश्रामगृहासमोर ‘पदवीधर’ नावानेच चहाचा हातगाडा टाकला आहे. याच चहाच्या हात गाड्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा ताफा पोहचला आणि पदवीधर मुलाने बनवून दिलेल्या चहाचा घोट घेत चर्चा केली. एवढेच नाही तर धनंजय मुंडेंनी प्यायलेल्या चहाचे 2000 रुपये देखील दिले.

dhananjay munde, ‘पदवीधर’ टी स्टॉलवर धनंजय मुंडे प्यायले 2 हजार रुपयांचा चहा

नितीन धुताडमल या युवकाने समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पीएसआय परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने थोडक्यात पद हुकले. दुसरीकडे कुठेही नोकरी मिळत नाही म्हणून हतबल होऊन त्याने बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर चहाची टपरी टाकली. यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. त्याचा या ‘पदवीधर’ टी स्टॉलला राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली.

नितीनने या टपरीचं नावही ‘पदवीधर’ ठेवून, युवकांना रोजगाराची खोटी आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारला एक चपराक दिली आहे. अशा हजारो पदवीधर युवकांना हतबल होण्याची वेळ या भाजपा सरकारमुळे आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये हेच बेरोजगार तरुण भाजपाला धूळ चारतील, अशा प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी यावेळी दिल्या.

घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदानिर्वाह चालविण्यासाठी या पदवीधर तरुणाने चहाचा ठेला टाकला. याला महिना होतोय। दिवसाकाठी सर्व वजा होऊन नितीनला 500 रुपये दररोज मिळकत होते. मात्र चहाच्या ठेल्यावर राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि त्यांचा ताफा चहा घेण्यासाठी येईल याची कल्पना नितीनला नव्हती. धनंजय मुंडेंनी चहा घेतल्याने नितीनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

dhananjay munde, ‘पदवीधर’ टी स्टॉलवर धनंजय मुंडे प्यायले 2 हजार रुपयांचा चहा

पदवी हातात घेऊन ही नोकरी मिळत नसल्याने हतबल झालेल्या समाजशास्त्राच्या या तरुणावर चक्क चहा विकण्याची वेळ आली आहे. मात्र आलेल्या परिस्थितीवर मात करत नितीनने उचलले पाऊल सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आदर्शच म्हणावे लागेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *