मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. धनंजय मुंडेंवर चहूबाजूंनी टीका होत असतानाही त्यांनी जनता दरबारचं आयोजन करून अनेकांनाच अवाक् केलं होतं. खरं तर धनंजय मुंडे ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याचदा व्यक्तही होत असतात. आता त्यांच्या एका मित्राचा मृत्यू झाल्यानं ते पुन्हा एकदा भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय. (Dhananjay Munde Is Emotional After The Death Of His Friend)
धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. अनंता… मित्रा….सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकायला गेलो, तेव्हा पहिल्या लेक्चरला भेटलेला पहिला मित्र तू. तरुण वयात अनेक आठवणी मागे ठेवून अचानक आमच्यातून निघून गेलास. अनंता तुला विसरणं आणि हे दुःख पचवणं खरंच खूप कठीण आहे रे, असं ट्विट करत धनंजय मुंडे फारच भावुक झाले.
अनंता… मित्रा….
सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकायला गेलो तेव्हा पहिल्या लेक्चरला भेटलेला पहिला मित्र तू. तरुण वयात अनेक आठवणी मागे ठेऊन अचानक आमच्यातुन निघून गेलास . अनंता तुला विसरणं आणि हे दुःख पचवणं खरंच खूप कठीण आहे रे…
तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा…?😢 (1/2) pic.twitter.com/fvFUvOfaFJ— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 21, 2021
तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा…?, मी अनंत पाटील यांचे आई-वडील, पत्नी आणि सर्व कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. तरुण वयात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याचे दुःख पचवण्याची शक्ती त्यांना देवो, हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना. अँड अनंत पाटील यांस भावपूर्ण श्रद्धांजली. या कुटुंबाशी जवळीकता आणि बांधिलकी कायम राहील, असंही धनंजय मुंडेंनी अधोरेखित केलंय. धनंजय मुंडेंच्या या भावनिक प्रतिक्रियेची सगळीकडेच चर्चा आहे.
मी अनंत पाटील यांचे आई-वडील, पत्नी आणि सर्व कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. तरुण वयात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याचे दुःख पचवण्याची शक्ती त्यांना देवो, हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना… अँड अनंत पाटील यांस भावपूर्ण श्रद्धांजली. या कुटुंबाशी जवळीकता आणि बांधिलकी कायम राहील. (2/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 21, 2021
संबंधित बातम्या
चेहऱ्यावर ताण-तणाव… पण धनंजय मुंडेंचा ‘द शो मस्ट गो ऑन’
धनंजय मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांवर शरद पवार म्हणतात…
Dhananjay Munde Is Emotional After The Death Of His Friend