राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन, अहमदपुरात अंत्यसंस्कार

लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज निधन (Dr. shivling shivacharya Maharaj Died) झाले.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन, अहमदपुरात अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 7:58 PM

नांदेड : लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज निधन झाले. ते 104 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अहमदपूर येथे अंतिम विधी केले जाणार आहे. त्यांचे पार्थिव नांदेडहून अहमदपूर या ठिकाणच्या भक्तीस्थळावर नेले जाणार आहे. (Dr. shivling shivacharya Maharaj Died)

गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. काल (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र दुर्देवाने आज त्यांचे निधन झाले.

चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर हजारो भाविकांनी अहमदपूरजवळ गर्दी केली होती.  त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकमधील लाखो भक्तांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

“धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदपूर महाराजांना श्रद्धांजली वाहिली.

“वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज कोण होते?

राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत. वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांनी दोन वेळा तुरुंगवासही भोगला होता. (Dr. shivling shivacharya Maharaj Died)

संबंधित बातम्या :

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.