धुळे ठरले राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर, जिल्हाही कोरोनामुक्तीच्या दिशेनं

धुळे ठरले राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर, जिल्हाही कोरोनामुक्तीच्या दिशेनं
कोरोना

शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत . त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

विशाल ठाकूर

| Edited By: Vaibhav Desai

Aug 07, 2021 | 4:16 PM

धुळे : धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत शहरात कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत . त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

दोन महिन्यांत कोणत्याही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

शहरात 25 जुलै रोजी शेवटचा कोरोना रुग्ण आढळला होता. नंतर 3 ऑगस्टपासून एकही नवीन रुग्ण नाही. गेल्या दोन महिन्यांत कोणत्याही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. यापूर्वी 8 जून रोजी 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. कोरोनाने मृत्यू झालेला शहरातील तो शेवटचा रुग्ण होता. 31 डिसेंबर 2020 ला शहरात सर्वाधिक 111 रुग्ण बाधित होते. यानंतर ही संख्या कमी झाली. 5 फेब्रुवारी 2021 रोजी शहरातील बाधितांची संख्या 53 होऊन हा आकडा वाढत होता.

धुळे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर

25 जुलै रोजी ही संख्या शेवटच्या एका रुग्णावर येऊन थांबली. नियमांची अंमलबजावणी लसीकरण आणि प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न यामुळेच धुळे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. मात्र शहर जरी कोरोनामुक्त ठरलं असेल तरी कोरोनाचा धोका टळलेल्या नाही, त्यामुळे याची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील मनपा आयुक्त अजिज शेख यांनी केले.

धुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

तसेच जिल्ह्यातील साक्री तालुकावगळता शिरपूर, शिंदखेडा आणि ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असल्याने धुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे कोरोनाचे जिल्हा समन्वयक डॉ. विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

नागरिकांनी केलेले लसीकरण, कडक निर्बंध, शारीरिक अंतर, मास्कचा वापर केल्याने कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमासमोर बोलताना सांगितले. तसेच डेल्टा प्लस विषाणू आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील अधिकऱ्यांनी केले.

संबंधित बातम्या:

वाशिम-गोंदियात कोरोनानंतर नवं संकट, ‘या’ आजाराच्या पहिल्या बळीने खळबळ

मोठी बातमी! भंडारा जिल्हा कोरोना मुक्त; शेवटच्या रुग्णालाही मिळाला डिस्चार्ज

Dhule became the first corona free city in the maharashtra

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें