धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट (Dhule chemical factory blast) झाला. या प्रकरणी पोलिसांनी फॅक्टरी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

धुळे : शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट (Dhule chemical factory blast) झाला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 जण जखमी झाले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी फॅक्टरी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (homicide case) दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेला जवळपास 20 तास उलटूनही अद्याप फॅक्टरीबाबत (Dhule chemical factory blast) कोणताही जबाबदार अधिकारी समोर आलेला नाही.

वर्ध्यातील शिरपूर शहराजवळ असलेल्या वाघाडी गावात असलेल्या रुमित केमिकल फॅक्टरी बॉयलरमध्ये (Dhule chemical factory blast) काल (31 ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यात 13 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या फॅक्टरीतील सर्व कामगार हे मध्यप्रदेश, गुजरातमधील आदिवासी भागात राहणारे होते.

या फॅक्टरीत व्यवस्थापनाने सुरक्षिततच्या दृष्टीनं काही उपाययोजना केल्या होत्या का याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या दुर्घटनेला जवळपास 20 तास उलटूनही अद्याप कोणताही जबाबदार अधिकारी समोर आलेला नाही. दरम्यान पोलिसांनी फॅक्टरी व्यवस्थापनाविरोधात सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज या रस्त्यावर येण्या-जाणाऱ्यांनी नागरिकांनी मात्र बेचिराक झालेल्या फॅक्टरीकडे पाहून विश्वास बसत नाही. या दुर्घटनेमुळे क्षणात होत्याचं नव्हत झालं अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली.  सुरुवातीला या फॅक्टरीतून मोठा आवाज आला. त्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडायला सुरुवात झाली. ही आग लागल्यानंतर एका विशिष्ट रसायनाचा वास बाहेर पडायला लागला. त्यामुळे अनेकांचे जीव हे वासाने गुदमरुन गेले असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. मात्र ही मदत वाढवून मिळावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *