Dhule : नारळाएवढा मुतखडा काढण्यात डॉक्टरांना यश, शेतकऱ्याचे प्राण वाचले

रुग्नांची अवस्था अत्यंत वाईट होती. कारण त्यांना अधिक त्रास जाणवू लागला होता. परंतु, रुग्णाचे अन्य अवयव व्यवस्थित कार्यान्वित ठेवताना तो बाहेर काढत शस्त्रक्रिया यशस्वी केली.

Dhule : नारळाएवढा मुतखडा काढण्यात डॉक्टरांना यश, शेतकऱ्याचे प्राण वाचले
भारतातली पहिली मोठी शस्त्रक्रिया! Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 11:09 AM

धुळे – आजही अनेकजण मुतखड्याच्या (kidney stones) त्रासाने त्रस्त आहेत. परंतु त्यावर शस्त्रक्रिया करण्यास घाबरत असतात. परंतु धुळ्यात (Dhule) शेतकऱ्यांचा नारळाएवढा मुतखडा काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे प्राण वाचले आहेत. धुळे शहरातील डॉक्टर आशिष पाटील (Ashish Patil) यांनी ही शस्त्रक्रिया केली असून लोक त्यांचं कौतुक करीत आहेत. त्यांच्या या कामगीरीमुळे त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. भारतात इतका मोठा मुतखडा त्यांनी पहिल्यांदा काढला असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत.

ब्लेंडरमध्ये मोठा खडा असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी अत्यंत हुशारीने ऑपरेशन केलं

नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील पन्नास वर्षीय शेतकरी रमण चौरे यांना गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार लघवीचा त्रास होत होता. त्यांनी तेजनक्ष फाऊंडेशनमध्ये तपासण्या केल्या. त्यावर ऑपरेशन करणं गरजेचं असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब आशिष पाटील यांच्याकडून ऑपरेशन करून घ्यायचं ठरवलं. त्यांच्या ब्लेंडरमध्ये मोठा खडा असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी अत्यंत हुशारीने ऑपरेशन केलं. खड़ा ब्लॅडरच्या हाडांमध्ये रुतून बसला होता. त्यामुळे हा खडा हाडातून बाहेर काढताना 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागला.

हे सुद्धा वाचा

लघवीसंदर्भात तक्रारीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते

रुग्नाची अवस्था अत्यंत वाईट होती. कारण त्यांना अधिक त्रास जाणवू लागला होता. परंतु, रुग्णाचे अन्य अवयव व्यवस्थित कार्यान्वित ठेवताना तो बाहेर काढत शस्त्रक्रिया यशस्वी केली. चौरे यांची सखोल आरोग्य तपासणी केली असता, त्यांना मूतखड्यामुळे अन्य कोणताही गंभीर आजार झाला नसल्याची बाब डॉ. पाटील यांनी स्पष्ट केली आहे. किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे आजार अनेकदा उद्धभवत असतात. त्यामुळे किरकोळ आजार असतानाचं अशा आजारावरती उपचार करायला पाहिजेत असं डॉक्टरांनी नमून केले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.