पनवेलमध्ये लसीकरण केंद्रात हमरी-तुमरी, संतप्त नागरिक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद

ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन ॲपवर नोंदणी करून त्यानुसार आपली अपॉइंटमेंट निश्चित करतील, अशा व्यक्तींनाच त्या वेळेत लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पनवेल पालिकेने दिली आहे. Panvel vaccination centre

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, पनवेल
  • Published On - 15:24 PM, 3 May 2021
पनवेलमध्ये लसीकरण केंद्रात हमरी-तुमरी, संतप्त नागरिक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद
Panvel vaccination centre

पनवेल : महापालिकेच्या 3 लसीकरण केंद्रांवर केवळ 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आलेय. लसींचा साठा मोजकाच उपलब्ध झाल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण करण्याचा महापालिकेने निर्णय घेतलाय. ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन ॲपवर नोंदणी करून त्यानुसार आपली अपॉइंटमेंट निश्चित करतील, अशा व्यक्तींनाच त्या वेळेत लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पनवेल पालिकेने दिली आहे. (Dispute between angry citizens and health workers over vaccination in Panvel)

आरोग्य केंद्रावर नागरिक आणि आरोग्य अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये वाद

पनवेलमधील गावदेवी मंदिराजवळील प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. 1 या ठिकाणी लसीकरणासाठी टोकन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये आणि आरोग्य अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झालाय आणि या वादाचं पर्यावसान थेट हाणामारीत झालेय.

लसीकरणास पात्र व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने केंद्राबाहेर लावलीच नाही

लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींची यादी लसीकरण केंद्राबाहेरील दर्शनी भागात लावणे आवश्यक होते; जेणेकरून लसीकरणासाठी अपॉईंटमेंट मिळालेले व्यक्ती आणि अपॉईंटमेंट न मिळालेली व्यक्ती यांना आपले नाव यादीमध्ये पाहून निश्चित करता येईल. परंतु लसीकरणास पात्र व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने लसीकरण केंद्राबाहेर लावली नसल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या नियोजनाविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला.

रजिस्ट्रेशननंतरही कोटा असेल तरच लस मिळणार

या प्रकाराबाबत पालिकेकडे विचारणा केली असता, नागरिकांनी प्रथम आरोग्य सेतूमध्ये जाऊन किंवा कोविन या मोबाईल ॲप्लिकेशनवर रजिस्ट्रेशन करायचे. फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले म्हणजे लस मिळते असे नाही. तारखेनुसार कोटा निवडावा लागतो, जर कोटा असेल तर त्यावर क्लिक करून त्यानंतरच आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होते, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. थोडक्यात रजिस्ट्रेशननंतर कोटा असेल तरच लस मिळणार आहे.

तो नंबर असलेल्या नागरिकांनाच लस दिली जाते

दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळ घ्यावी लागते. त्यानंतर मोबाईलवर एक रेफरन्स नंबर येतो, ज्या नागरिकांना हा नंबर आलेला असतो फक्त त्या नागरिकांनाच लस दिली जाते. अशी माहिती महापालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

केंद्राचे सुरक्षारक्षक अदर पूनावालांची रेकी करत आहेत काय?; नाना पटोलेंचा केंद्राला गंभीर सवाल

Dispute between angry citizens and health workers over vaccination in Panvel