मतदानाच्या तोंडावर कोकणात महायुतीत भूकंप, भाजपने गुहागर आणि दापोलीत शिवसेनेचा प्रचार थांबवला, कारण काय?

गुहागर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. रामदास कदम यांनी विनय नातू यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हे झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी कदम यांच्या माफी मागण्याची मागणी केली आहे, अन्यथा प्रचार सुरू करणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मतदानाच्या तोंडावर कोकणात महायुतीत भूकंप, भाजपने गुहागर आणि दापोलीत शिवसेनेचा प्रचार थांबवला, कारण काय?
मतदानाच्या तोंडावर कोकणात महायुतीत भूकंप, भाजपने गुहागर आणि दापोलीत शिवसेनेचा प्रचार थांबवला, कारण काय?
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 7:52 PM

ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रचार थांबवला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. विशेष म्हणजे फक्त गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे. मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

“रामदास कदम यांनी तात्काळ डॉक्टर विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ”, अशी आक्रमक भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. “विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यावरती कोणीही काही बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. रामदास कदम आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची मिलीभगत आहे”, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

‘रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवा’, भाजपची मागणी

“दापोलीतून योगेश कदम तर गुहागरमधून रामदास कदम यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम याला उमेदवारी देण्यासाठी रामदास कदम यांचा डाव आहे”, असादेखील आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. “शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे”, अशी मागणी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंकडून मनधरणीचे प्रयत्न

निवडणुकीनंतर निकाल वेगळे आल्यास भाजपाला जबाबदार धरू नये, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विपूल कदम हे भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी गुहागरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची आता भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु असल्याची माहिती आहे. माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासह जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि तीनही तालुक्याचे तालुकाध्यक्ष बैठकीत उपस्थित आहेत. या बैठकीत काही मार्ग निघतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.