VIDEO: सिंधुदुर्गात सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

तर शिवसैनिकांनी या रस्त्याची दुरवस्था भाजपचं शासन असल्यापासून असल्याचा आरोप केलाय. या आरोप-प्रत्यारोपावरूनच दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. 

VIDEO: सिंधुदुर्गात सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

सिंधुदुर्ग : दोडामार्ग बाजारपेठेतील चौकात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते दोडामार्ग चौकात आमने-सामने आलेत. दोडामार्गातील विजघर-तिलारी आणि बांदा-दोडामार्ग या रस्त्याची चाळण झालीय. पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणा खड्डे पडले असून, अनेक अपघातही होत आहेत. त्यामुळेच या रस्त्यावरून जोरदार राडा झालाय. रस्त्याची कामं सत्ताधारी शिवसेनेनं तात्काळ करावीत, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. तर शिवसैनिकांनी या रस्त्याची दुरवस्था भाजपचं शासन असल्यापासून असल्याचा आरोप केलाय. या आरोप-प्रत्यारोपावरूनच दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.

वेळोवेळी आंदोलन करून देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष

मात्र वेळोवेळी आंदोलन करून देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष होत होतं. याला सत्ताधारी शिवसेना जबाबदार असल्याचा भाजपनं आरोप केला होता. तर यापूर्वी भाजप सत्तेत असतानाही हे रस्ते खड्डेमयचं होते, असाही पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला होता. याच आरोप-प्रत्यारोपांतून शिवसेना भाजपचे कार्यकर्ते भिडलेत.

दोडामार्ग पोलिसांनी वेळीच हस्तक्षेपानं दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत

त्यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय. मात्र दोडामार्ग पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देत होते. विकासकामाच्या श्रेयवादावरून शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने-सामने आलेत. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग शहरातली ही बाचाबाची झाली असून, मोठ्या प्रमाणात पोलीस जमा झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं आणि दोन बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले.  सोशल मिडियाच्या माध्यमातनं शिवप्रसाद आणि महाप्रसाद देण्याची भाषा करण्यात आली होती. यावेळेस 20 मिनिटं दोन्हीकडनं शाब्दिक चकमकीही झडल्या होत्या.  शिवप्रसाद काय देता ते आम्ही पाहतो” असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांनी घेतला होता. शहरातली विकासकामं कोणी केली याचं श्रेय घेण्यावरनं झाला राडा. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा राडा शांत झाला.

संबंधित बातम्या

कोकणात कोसळलेल्या पावसाने आल्हाददायक वातावरण, गारवेली धबधबा ओसांडून वाहू लागला

Dispute between Sena-BJP workers in Sindhudurg

Published On - 10:55 pm, Sun, 18 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI