कोविड रुग्णाला मुदतबाह्य औषधांचे वाटप, बुलडाणा जिल्ह्यात हे चाललंय तरी काय?

आदिवासी भागातील संग्रामपूर आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना समोर आलीय. कर्मचाऱ्यांनी एका रुग्णाला चक्क मुदतबाह्य औषधाचे वितरण केल्याचे समोर आलेय.

  • गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा
  • Published On - 0:37 AM, 8 Mar 2021
कोविड रुग्णाला मुदतबाह्य औषधांचे वाटप, बुलडाणा जिल्ह्यात हे चाललंय तरी काय?

बुलडाणाः बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील स्वॅब न घेताच एका नागरिकाचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक घटना घडलीय. आदिवासी भागातील संग्रामपूर आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना समोर आलीय. कर्मचाऱ्यांनी एका रुग्णाला चक्क मुदतबाह्य औषधाचे वितरण केल्याचे समोर आलेय. (Distribution Of Expired Drugs To Covid Patient, What Is Going On In Buldana District)

18 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह

संग्रामपूर या आदिवासीबहुल तालुक्यातील कोलद येथील एका सौरभ पाचपोर या 18 वर्षीय युवकाला सर्दी खोकल्याचा त्रास झाल्याने तो वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेला. तेथील डॉक्टरने त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली असता तो त्यात पॉझिटिव्ह आला. तेथील डॉक्टरने त्याला कोरोनाची RTPCR टेस्टसाठी संग्रामपूर येथील कोविड सेंटरला पाठविले.

मुदतबाह्य औषधं दिल्यानं तरुणाचा जीव टांगणीला

संग्रामपूर येथे सदर तरुणाचा स्वॅब घेतल्यावर डॉक्टरने झिंकसल्फेट डिस्पर्सिबल टॅब्लेट तसेच पॅरासिटेमॉल ही औषधे देऊन टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत घरी विलगीकरणात पाठविले. युवकाने घरी येऊन त्यातील 10 गोळ्या वेळेवर घेतल्या. अशात 5 मार्च रोजी या रुग्णाचे लक्षात आले की, त्याला मुदतबाह्य गोळ्या देण्यात आल्यात. याची माहिती रुग्णाने आरोग्य विभागाला दिली, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशात या युवकाचा रिपोर्ट 6 मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्यावरही त्याला योग्य औषधे देण्यासाठी आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टर आले नाहीत.

सरकारी रुग्णालयांचा भोंगळ कारभार

सदर मुदतबाह्य औषधी कोणी दिली? , आतापर्यंत किती रुग्णांना वाटप करण्यात आली?, जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील वाढलेला ताण, त्यातच अपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या आणि यामुळे होणाऱ्या चुका, यामुळे रुग्णाला नुकसान झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार ?, असा प्रश्न तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला. मुदतबाह्य औषधांनी रुग्णाला काहीही अपाय होणार नसल्याची सारवासारव केली आणि काही बरे वाईट झाल्यास जबाबदारी घेतो, असे उत्तर देण्यात आले. तर जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिलंय.

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला; वकिलाची पोलिसात तक्रार

Distribution Of Expired Drugs To Covid Patient, What Is Going On In Buldana District