शिर्डीः अहमदनगरमधल्या राहुरी तालुक्यातील महालगाव येथील गोधन डेअरीच्या वतीनं वर्षभर कुठलीही कपात न करता प्रतिलिटर दीड रुपयाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरात गोधन डेअरीच्या या कामगिरीची जोरदार चर्चा आहे. याशिवाय डेअरीतर्फे बळीराजाला मदत करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतींना पैठणी व दिवाळी फराळ देण्यात आला. गोधन डेअरीनं बळीराजाला दिलेल्या या गिफ्टमुळे त्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे. (Diwali Bonus To Farmers, Paithani And Faral; Gift From Godhan Dairy)
राहुरी तालुक्यातील महालगाव येथील गोधन डेअरी फार्म आहे. ज्योती चौरे यांनी सुरू हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पलातील दूध थेट गुजरातमध्ये अमूल डेअरीला जात असल्याने ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही डेअरी उभी करण्यात आली आहे. यावर्षी दुधाला उत्तम भाव देत त्यांनी बळीराजाचा विश्वास संपादन केला, मात्र कुठलीही कपात न करता प्रतिलिटर 1 रुपया 52 पैसे प्रमाणे रिबीट देण्यात आलं आहे. याशिवाय बळीराजाला साथ देणाऱ्या सौभाग्यवतींना पैठणीसुद्धा देण्यात आली आहे.
एकीकडे शेतकरी अडचणीत आल्यानं युवक शेतीत रस घेत नाही, मात्र जर संस्था सक्षम असल्या तरी युवक शेतीकडे वळतील, असा विश्वास डेअरीचे संचालक अभिजित चौरे यांनी सांगताना युवकांना शेती करण्याचं आवाहन केलंय. सहकारी संस्था वर्षभर कपात करत रिबीट देण्याची पद्धत असताना दुसरीकडे गोधन डेअरी फार्मच्या वतीने करण्यात आलेला उपक्रम बळीराजाला मदत करणारा आहे. वर्षभरात दूध उत्पादकांना दूध भावासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. त्यात लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला असताना राहुरी तालुक्यातील महालगाव येथील गोधन डेअरीच्या वतीनं वर्षभर कुठलीही कपात न करता प्रतिलिटर दीड रुपया रिबीट देण्यात आलं असून, याशिवाय बळीराजाला मदत करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतींना पैठणी व दिवाळी फराळ देण्यात आला आहे.
दरम्यान, “महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. आम्ही चांगली योजना आणू, आंदोलनामुळे ही बैठक होते असं नाही. ही बैठक आधीच नियोजित होती. मी स्वत: ही बैठक 16 जुलैला बोलवली होती. ही बैठक तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आली नव्हती. तर या बैठकीत संघटना आणि नेत्यांनी अनुदानासह दूध उत्पादनाच्या अडचणी मांडल्या होत्या,” असे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले होते. यावेळी बैठकीत माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह इतर काही संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संबंधित महत्त्वाच्या बातम्या
Raju Shetti | दूध आंदोलन चिघळणार, राजू शेट्टींचा सरकारला 5 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम