एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील दिवाळसण, बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीनं अमोल कोल्हे भावुक

तसेच बाबासाहेब पुरंदरेंकडून त्यांना ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ हे दिवाळी पुस्तक भेट मिळालं. फेसबुक पोस्ट करत अमोल कोल्हेंनी ही माहिती दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:17 PM, 13 Nov 2020
एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील दिवाळसण, बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीनं अमोल कोल्हे भावुक

मुंबईः शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिवाळीनिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवगंध’ पुस्तक बाबासाहेब पुरंदरे यांना भेट दिले. तसेच बाबासाहेब पुरंदरेंकडून त्यांना ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ हे दिवाळी पुस्तक भेट मिळालं. फेसबुक पोस्ट करत अमोल कोल्हेंनी ही माहिती दिली आहे.(Diwali Share With Babasaheb Purandare, Amol Kolhe Praised)

आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुक केले. स्वराज्यजननी जिजामाता मालिका, आगामी चित्रपट यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी ‘शिवगंध’ पुस्तक त्यांना दिले आणि त्यांच्याकडून ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ ही दिवाळी पुस्तक भेट मिळाली. वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसण, अशा भावनाही डॉ. अमोल कोल्हेंनी व्यक्त केल्या आहेत.

तत्पूर्वी प्रख्यात अभिनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर आपल्या पुढील वाटचालीबद्दल घोषणा केली होती. अमोल कोल्हे यांनी आपल्या ‘जगदंब क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत एकूण तीन चित्रपट येणार असल्याचं जाहीर केलं होतं. अमोल कोल्हेंनी फेसबुक पोस्टमधून मोठ्या घोषणेचं सूतोवाच (MP Amol Kolhe Big Announcement) केल्यानंतर चाहत्यांचं याकडे लक्ष लागून राहिलं होतं.

जगदंब क्रिएशन्स पुढच्या टप्प्यावर चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं. ‘शिवप्रताप’ नावाच्या चित्रपट शृंखले अंतर्गत वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहेत. हे तिन्ही चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. दरम्यान, ‘जगदंब क्रिएशन्स’ बॅनरखाली यापूर्वी बंधमुक्त हे नाटक, एक महानाट्य आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या दोन मालिका करण्यात आलेल्या आहेत. या मालिकेच्या प्रवासात ‘झी मराठी’चे मोठे योगदान असल्याचं डॉ. कोल्हे यांनी सांगितलं होतं.

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा!