प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट तातडीने करा, अजित पवारांच्या सूचना

फायर ऑडिट प्राधान्याने करून घेण्यात यावे. तसेच प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Hospital Fire Audit)

प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट तातडीने करा, अजित पवारांच्या सूचना
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 3:22 PM

बारामती : गेल्या महिनाभरात राज्यात दोन कोरोना रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे तातडीने फायर ऑडिट करुन घ्यावे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. (Do Every Hospital Fire Audit immediately Ajit Pawar instructions)

प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडिट प्राधान्याने करुन घ्या

काल नागपुरातील एका कोव्हिड रुग्णालयात अग्नितांडव पाहायला मिळालं. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. तर त्यापूर्वी भांडूपच्या एका मॉलमधील कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडिट प्राधान्याने करून घेण्यात यावे. तसेच प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅन द्वारे कोरोना तपासणी करण्यात यावी

प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

सद्यस्थितीत बारामती तालुक्यात शासन आणि प्रशासन यांच्या मार्फत विविध उपाययोजना करून देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांर्भीयाने घेणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यात मोबाईल कोरोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची कोरोनाची तपासणी केली जाते, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅन द्वारे कोरोना तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घ्याव्यात

रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे. बारामती तालुक्यातील वृध्दाश्रमामध्ये जावून तेथील वृध्दांची व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. आरोग्य सेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्यात याव्यात. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्री याची कमतरता भासल्यास औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांची मदत घ्यावी.

लसीकरणाचा वेग वाढवावा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे पालन केले जात नाही, हे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. जे नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. (Do Every Hospital Fire Audit immediately Ajit Pawar instructions)

संबंधित बातम्या : 

अनिल देशमुखांचा बचाव करण्यास असमर्थ ठरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार नाराज

‘प्रसंग बाका आहे, सरकार कोणाचं हे पाहू नका; फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी’

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.