नांदेडमध्ये यावेळी मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आढावा घेत आहेत. भाजपकडूनही नांदेडमध्ये कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला हजर राहिले. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे अदृश्य हात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका असं उघडपणे वक्तव्य केलं. …

नांदेडमध्ये यावेळी मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आढावा घेत आहेत. भाजपकडूनही नांदेडमध्ये कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला हजर राहिले. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे अदृश्य हात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका असं उघडपणे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद देत नारेबाजी केली.

वाचाआमदाराचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, लवकरच भाजपात प्रवेश!

लोकसभा निवडनुकीत मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका म्हणजे आपल्याला नांदेडची जागा जिंकणं सोप होईल, असंही प्रताप पाटील म्हणाले. निवडणुका दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण ज्या ‘शाळा’ करतात ते मला चांगलंच ठाऊक आहे, अस वक्तव्य पाटील यांनी केलं. निवडणुकी दरम्यान अशोक चव्हाण विरोधी उमेदवाराला मॅनेज करतात, हे प्रताप पाटील यांनी व्यासपीठावर जाहीरपणे सांगितल्याने भाजपा कार्यकर्ते प्रचंड सुखावले. पाटील यांच्या या बोलण्यावर प्रचंड टाळ्या वाजवत भाजपा कार्यकर्त्यांनी दाद दिली. त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या भास्करराव पाटील खतगावकर यांनीही प्रताप पाटील यांच्या मॅनेज वक्तव्याचा धागा पकडत भाषण केलं.

वाचानांदेड लोकसभा : अशोक चव्हाणांची यंदा मुख्यमंत्रीपदासाठी बॅटिंग

अशोक चव्हाण यांचे मेहुणे असलेल्या खतगावकर यांनी व्यासपीठावरच कुणीही अशोक चव्हाण यांना मॅनेज नसल्याचं सांगितलं. तसंच खतगावकर यांनी उघडपणे पहिल्यांदा आपल्या मेहुणे अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र संपवण्याचं काम अशोक चव्हाण यांनी केल्याची टीका त्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही बोलताना प्रतापरावांच्या मॅनेज वक्तव्याचा संदर्भ घेतला. अशोक चव्हाण हे आपले सर्वांशी चांगले संबंध असल्याचं भासवतात. पण तुम्ही चिंता करू नका, यावेळी नांदेडची जागा आपण जिंकूच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *