वंचितला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात तुषार गांधी मैदानात
महाविकास आघाडीशी जागावाटपाबाबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. एवढंच नव्हे तर त्यांनी मविआच्या उमेदवारांच्या विरोधातही उमेदवारही उभे केले. त्यांच्या याच भूमिकेवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडाडून टीका केली

महाविकास आघाडीशी जागावाटपाबाबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. एवढंच नव्हे तर त्यांनी मविआच्या उमेदवारांच्या विरोधातही उमेदवारही उभे केले. त्यांच्या याच भूमिकेवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडाडून टीका केली आहे. ‘ प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेने तर भाजपलाच फायदा होणार आहे ना असे म्हणत वंचित आणि MIM ला मतदान करू नका’ असं आवाहन तुषार गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे आंबेडकर विरुद्ध गांधी असा वाद पेटू शकतो.
तुषार गांधी काय म्हणाले ?
देशात सध्या राष्ट्रीय पातळीवर इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढत सुरू आहे. तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं मविसोबत न जाता, वेगळी चूल मांडल्यानं पुरोगामी विचारांच्या पक्षांना काही प्रमाणात फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुषार गांधी यांनी मतदारांना आवाहन केलं आहे.
भाजपाच्या युतीला गद्दारांची युती म्हटले पाहीजे. या गद्दाराच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहीजे. यासाठी एमआयएम (MIM) आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन तुषार गांधी यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी मैत्रीभाव आहे. पण त्यांचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी एकत्र यायला हवं होतं. त्यांच्या भूमिकेने तर न तर भाजपलाच फायदा होणार आहे ना, त्यामुळे ते टीकेस पात्र आहेत, असे तुषार गांधी म्हणाले.
ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे, संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. महाविकास आघाडीला मतदान करा अस आम्ही सांगणार आहोत असं म्हत वंचित आणि MIM ला मतदान करू नका असं आवाहनही तुषार गांधी यांनी केलं.