साताऱ्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे साडेआठ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू?

सातारा : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली शिंदे आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. ही घटना साताऱ्यातील संचित रुग्णालयात घडली. यावेळी नातेवाईक आणि कामाठीपुरा येथील नागरिकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. …

साताऱ्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे साडेआठ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू?

सातारा : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली शिंदे आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. ही घटना साताऱ्यातील संचित रुग्णालयात घडली. यावेळी नातेवाईक आणि कामाठीपुरा येथील नागरिकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

साताऱ्यात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आई आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू  झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी संबधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करीत आहेत. मयत दीपाली शिंदे यांचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता. त्या बाळंतपणासाठी साताऱ्यात आल्यानंतर त्यांच्या नावाची नोंदणी नातेवाईकांनी गोडोली येथील संचित रुग्णलयात केली.

दीपाली साडेआठ महिन्यांची गर्भवती असेपर्यंत याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र 25 डिसेंबर रोजी दीपालीला ताप आल्याने संचित रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. अपर्णा जगताप यांनी तपासणी केली असता सर्व काही नॉर्मल असल्याचे सांगत त्यांनी ताप कमी होण्याच्या गोळ्या दिल्या. दरम्यान तीन दिवस औषधे घेतल्यानंतरही दीपालीचा ताप कमी न झाल्यामुळे पुन्हा रुग्णलयामध्ये नेण्यात आले. मात्र डॉ. अपर्णा जगताप गावाला गेल्याचे सांगत त्या ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी दीपाली यांना दुसर्‍या रुग्णालयामध्ये पाठवून  दिले. तेथील डॉक्टरांनी दीपाली यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. याबाबत डॉ. जगताप यांनाही फोन करून तत्काळ सांगून त्याच दवाखान्यात नेण्यास सांगितले.

यावेळी दिपालीला पुन्हा संचित रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर बाळ दगावल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी दीपालीच्या रक्त तपासणी अहवालात तिच्या शरीरात कावीळचे प्रमाण असल्याचे सांगून डॉ. जगताप यांनी दीपालीला मुंबई उपचारासाठी नेण्यास सांगितले. यानंतर 30 डिसेंबरला मुंबई येथील सायनमध्ये दिपालीला उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारासाठी दिरंगाई केल्याचे सांगितले. तपासणी अहवाल पाहून त्याठिकाणच्या डॉक्टरांनी दीपाली यांना कावीळ झाली आहे. तुम्हाला आधी तपासणी डॉक्टरांनी सांगितले नाही का? असा प्रश्न डॉक्टरांनी विचारला. मात्र 6 जानेवारीला दीपालीचा रात्री उशिरा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

दीपाली यांच्या मृत्यूस डॉ. अपर्णा जगताप यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. या ठिकाणी मोठा जमाव जमा झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र संचित रुग्णालयाच्या डॉ. अपर्णा जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक करीत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *