पक्षातून जेवढी लोक गेली त्यांनी स्वतःला विकलं; मनोज घरत यांची पक्षांतर करणाऱ्यांवर सडकून टीका

पद आणि कार्यालय देऊनही त्यांचं पोट भरलं नाही ते गेले ते चांगलं झालं, असं मनोज घरत म्हणाले. (MNS Manoj Gharat)

पक्षातून जेवढी लोक गेली त्यांनी स्वतःला विकलं; मनोज घरत यांची पक्षांतर करणाऱ्यांवर सडकून टीका
मनोज घरत, डोंबिवली शहराध्यक्ष, मनसे

कल्याण डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गेल्या काही दिवसांमध्ये धक्के बसले होते. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी डॅमेज कंट्रोल करत मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांच्याकडे डोंबिवली शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. मनोज घरत यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. आपल्याकडे इमान आहे आणि तो आपण कोणासाठी विकणार नाही. ही जेवढी लोक गेलेली आहे त्यांनी स्वतःला विकले, असा आरोप मनोज घरत यांनी केला. (Dombivli MNS Leader Manoj Gharat slams Rajesh Kadam and Mandar Halabe for quitting party)

मनोज घरत काय म्हणाले?

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये गेलेल्या राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्यावर निशाणा साधला. आपल्याकडे इमान आहे आणि तो आपण कोणासाठी विकणार नाही. ही जेवढी लोक गेलेली आहे त्यांनी स्वतःला विकले आहे. गटनेता, विरोधी पक्षनेत्याचे पद आणि कार्यालय दिले तरी त्याचे पोट भरले नसेल तो व्यक्ती गेलेला हे आपल्यासाठी चांगले आहे, असं मनोज घरत म्हणाले. काही दिवसांपूर्वी मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर, कल्याण डोंबिवली गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

डोंबिवलीत मनसेचे शक्तिप्रदर्शन….

डोंबिवलीमध्ये रविवारी मनसेने कार्यकर्ता मेळावा घेत शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले.डोंबिवली मधील मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत तर केडीएमसी गटनेते मंदार हळबे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने मनसे मध्ये खळबळ माजली होती.त्यामुळे थेट अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदर राजू पाटील यांनी तातडीने डॅमेज कंट्रोल करत मनसे माजी नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवली आक्रमक चेहरा असलेले मनोज घरत यांना डोंबिवली शहराध्यक्ष पद दिले. मनोज घरत यांनीही विलंब न करता त्वरित कार्यकर्त्यांना एकत्रित करत शक्ती प्रदर्शन केले आणि मेळावा घेतला. यावेळी डोंबिवली मधील तरुण मंडळीनी पक्ष प्रवेश सुद्धा केला. नवनिर्वाचित शहराध्यक्ष मनोज घरत यांनी पक्ष सोडून गेलेल्यावर सडकून टीका केली

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या नेत्यांचं पक्षांतर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना आणि भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेला मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळालं. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठी गळती लागण्याची शक्यता होती. गेल्या आठवड्यात कल्यामधील मनसेच्या 320 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश होता. मात्र, मनसे आमदार राजू पाटील यांच्या शिष्टाईमुळे या कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात यश आले.

संबंधित बातम्या:

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

(Dombivli MNS Leader Manoj Gharat slams Rajesh Kadam and Mandar Halabe for quitting party)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI