ST Bus Driver : दारु पिऊन एसटी चालवणारे नकोच! एसटी चालकाची होणार ब्रेथ एनालायझर टेस्ट

सिद्धी बोबडे

सिद्धी बोबडे | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Jun 15, 2022 | 10:47 AM

एसटीच्या ड्रायव्हरची 'ब्रेथ एनालायझर' ने टेस्ट होणार. मद्यप्राशन केले नसल्याची खात्री झाल्यावरच बस ताब्यात मिळणार

ST Bus Driver : दारु पिऊन एसटी चालवणारे नकोच! एसटी चालकाची होणार ब्रेथ एनालायझर टेस्ट

मुंबई,  पालघरच्या वाघोबा खिंडीत एसटीचा स्लिपर कोच कोसळून 15 प्रवाशी नुकतेच जखमी झाले होते. अपघातग्रस्त चालकाने मद्यप्राशन केले होते अशी माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे आता ड्रायव्हरची ब्रेथ अॅनालायझरने टेस्ट करून खातरजमा झाल्यानंतरच त्यांच्या हातात एसटीचे स्टेअरिंग देण्यात येणार आहे.

27 मे रोजी मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने पालघर येथे एसटीचा स्लिपरकोच कोसळून पंधरा प्रवाशी जखमी झाले होते. त्यामुळे प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रकाने आता कामगिरीवर जाणाऱ्या चालक आणि वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्तव्यावर पाठवावे असे आदेशच महामंडळाने काढले आहेत.

मद्यप्राशन केले नसल्याची खात्री झाल्यावरच बस ताब्यात मिळणार

वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्तव्यावर पाठवावे असे आदेशच महामंडळाने काढले आहेत.एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक, वाहन परिक्षक यांनी तातडीने स्थानक, आगार प्रमुख यांना त्याची माहिती ताबडतोब द्यावी. त्यानंतर त्याला कामगिरीवरुन उतरुन घेतील. तसेच त्वरित ड्रायव्हरची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात येऊन खातेंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

रातराणीच्या ड्रायव्हरची तपासणी

ज्या आगारात अल्कोहोल टेस्ट मशीन उपलब्ध आहे त्या आगारांनी स्वतःच्या व इतर आगारांच्या मार्गस्थ होणाऱ्या बसेसच्या चालकांची प्रामुख्याने लांब पल्ला रातराणी बसेसची तपासणी करावी व त्याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवावी असे आदेशात म्हटले आहे. या मोहिमे दरम्यान अल्कोहोल टेस्ट मशीनद्वारे विभागातील सर्व मार्गतपासणी पथके, वाहतूक निरीक्षक चालक प्रशिक्षण व सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षक यांच्यामार्फत तपासणी कार्यक्रम राबविता येईल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI