आधी पुतणी आणि वहिनीची हत्या, नंतर दीराकडून मृतदेहावर बलात्कार

नागपूर : नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरात घडली. कामवासनेत बुडालेल्या दिराने आपल्या वाहिनीची आणि चिमुकल्या पुतणीची हत्या केली आणि नंतर वहिनीवर बलात्कार केला. पोलिसांनी या नराधम आरोपीला अटक केली आहे. चंद्रशेखर बिंद असं या उच्चशिक्षित तरुणाचं नाव आहे. या आरोपीचं डी फॉर्मपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आरोपी एका मेडिकलमध्ये काम करत होता. त्याचा भाऊ ट्रक …

आधी पुतणी आणि वहिनीची हत्या, नंतर दीराकडून मृतदेहावर बलात्कार

नागपूर : नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरात घडली. कामवासनेत बुडालेल्या दिराने आपल्या वाहिनीची आणि चिमुकल्या पुतणीची हत्या केली आणि नंतर वहिनीवर बलात्कार केला. पोलिसांनी या नराधम आरोपीला अटक केली आहे. चंद्रशेखर बिंद असं या उच्चशिक्षित तरुणाचं नाव आहे. या आरोपीचं डी फॉर्मपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे.

आरोपी एका मेडिकलमध्ये काम करत होता. त्याचा भाऊ ट्रक चालक असल्याने तो बाहेर गावी गेल्याचं चंद्रशेखरला माहित होतं. वहिनी आणि पुतणी घरी एकटी असल्याचं पाहून तो घरी गेला. दोघींशीही बोलला आणि नंतर त्याने वहिनीची गळा दाबून हत्या केली.

चिमुकल्या पुतणीने हा सर्व प्रकार पाहिल्यामुळे आरोपीने तिचीही गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर या आरोपीने वहिनीवर बलात्कार केला. सर्व आरोपांची कबुली या नराधमाने पोलिसांसमोर दिली असल्याची माहिती आहे.

28 तारखेच्या रात्री एका घरात महिला आणि मुलगी मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरु केला. पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही. दोघींनी आत्महत्या केली असावी अशी शंका सुरुवातीला आली. पण पोलिसांचा संशय बळावला आणि तपासात चंद्रशेखरचं नाव पुढे आलं. त्याला अटक केली असता त्याने सर्व गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी शिक्षित असला तरी त्याला अश्लील चित्रफित पाहण्याचं वेड होतं. या वासनेच्या भरातच त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *