भाजप सरकार नव्हे तर एका मंत्र्याकडून त्रास झाला होता : तात्याराव लहाने

आता डॉ. तात्याराव लहाने यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. (Dr. Tatyarao Lahane Big Statement On BJP Minister)

भाजप सरकार नव्हे तर एका मंत्र्याकडून त्रास झाला होता : तात्याराव लहाने
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 11:43 PM

मुंबई : “गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला,” असा गौप्यस्फोट पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला होता. यानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात होती. यानंतर आता डॉ. तात्याराव लहाने यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात सरकारने त्रास दिला नाही, तर भाजपच्या एका मंत्र्याने त्रास दिला,” असे तात्याराव लहाने म्हणाले.  (Dr. Tatyarao Lahane Big Statement On BJP Minister)

“तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला कायमच पाठिंबा दिला. वेळोवेळी सहकार्य केले. त्यावेळीही धनंजय मुंडे हेही कायम आपल्या पाठीशी उभे होते. फडणवीस सरकारच्या काळात ‘नेत्रदानाचा महायज्ञ’ ही संकल्पना राबविता आली. त्यावेळी नेत्रतज्ज्ञ म्हणून अनेक उपक्रम राबवता आले.”

“पण फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळात एका मंत्र्यामुळे मला त्रास झाला होता. पण तेव्हाही देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन माझ्या पाठीशी उभे होते,” असा आणखी एक गौप्यस्फोट तात्याराव लहाने यांनी केला.

दरम्यान तात्याराव लहाने हे गेल्या काही दिवसांपासून भाजपबद्दल किंवा भाजपमधील मंत्र्यांबद्दल गौप्यस्फोट करत आहे. यावर भाजपकडून मात्र अद्याप काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

अहमदनगरमध्ये तात्याराव लहाने काय म्हणाले?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने अहमदनगर येथे आले होते. यावेळी लहाने यांनी धनंजय मुंडें यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. यावेळी बोलताना लहाने यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. मागील सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला, असं वक्तव्य लहाने यांनी यावेळी बोलताना केले होते.

“धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन,” असे डॉ. तात्याराव लहाने म्हणाले होते.  (Dr. Tatyarao Lahane Big Statement On BJP Minister)

संबंधित बातम्या :

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला, तात्याराव लहानेंचा गौप्यस्फोट

तात्याराव लहानेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, दरेकर म्हणाले…

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.