Vegetable Prices Today | भाज्यांचे दर गडगडले, फ्लॉवर 8 रुपये तर टोमॅटो 15 रुपये किलो

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गडगडले आहेत.

Vegetable Prices Today | भाज्यांचे दर गडगडले, फ्लॉवर 8 रुपये तर टोमॅटो 15 रुपये किलो
Vegetables

नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे (Vegetable Prices Today). त्यामुळे भाज्यांचे दर गडगडले आहेत. बहुतांश भाज्या या 20 ते 25 रुपये किलोच्या घरात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता ताज्या भाज्या स्वस्त दरात मिळणार आहेत (Vegetable Prices Today).

सध्या भाज्याची निर्यात होत नसल्याने भाज्यांच्या दरात घट झाली आहे. त्याउलट हिवाळ्यात भाज्यांची आवक वाढते. सध्या मार्केटमध्ये 600 भाजीपाल्यांच्या गाड्या येत आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात माल पडून आहे. त्यामुळे भाजीवाले अगदी कमी दरात हा भाजीपाला विकत आहेत. परिणामी घाऊक भाजीपाला बाजारातील दर कमी झाले आहेत.

भाजीपाल्यांचे घसरले दर

किलोप्रमाणे भाज्यांचे दर

कोबी – 6 रुपये किलो
फ्लॉवर – 8 रुपये किलो
भोपळा – 10 रुपये किलो
काकडी- 8 रुपये किलो
पडवळ – 12 रुपये किलो
सुरण – 10 रुपये किलो
टोमॅटो- 15 रुपये किलो
वांगी – 15 रुपये किलो
कारले – 22 रुपये किलो
घेवडा- 25 रुपये किलो
भेंडी- 20 रुपये किलो
फरसबी – 20 रुपये किलो
मटार – 18 ते 22 रुपये किलो

Vegetable Prices Today

मटारही स्वस्त

बाजारात मटारच्या दररोज 50 ते 60 गाड्या येत आहेत. त्यामुळे मटारही स्वस्त झाले आहे. सध्या मटार 18 ते 22 रुपये किलोच्या भावाने विकला जात आहे, अशी माहिती बाजार समितिने दिली आहे.

भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरुच असून आणखी काही दिवस हे दर असेच राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसतरी ग्राहकांना कमी दरात भाजीपाला मिळणार आहे.

Vegetable Prices Today

संबंधित बातम्या :

फळं-भाज्यांच्या सालांमध्ये लपलेत भरपूर औषधी गुणधर्म! पाहा ‘या’ सालींचे फायदे…

Vegetable Prices Today : भाज्यांच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI