लाल ठिपक्यांनी धाकधूक वाढवली, महाराष्ट्राच नव्हे तर अर्धा देश दुष्काळाच्या छायेत

देशातील पाऊस दाखवणारा भारतीय हवामान विभागाच्या मॅपमुळे पावसाचं चित्र दिसून येतं. मॅपवर दिसणारा लाल रंग निम्म्या देशावर दुष्काळाचं संकट असल्याचं दर्शवत आहे.

लाल ठिपक्यांनी धाकधूक वाढवली, महाराष्ट्राच नव्हे तर अर्धा देश दुष्काळाच्या छायेत

नागपूर: भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीने देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. कारण या आकडेवारीनुसार साधारण निम्म्या देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 350 जिल्ह्यात सरासरीच्या कमी पाऊस पडला आहे. यामुळे आता निम्मा देश दुष्काळाच्या उंबरठ्यावर तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

देशातील पाऊस दाखवणारा भारतीय हवामान विभागाच्या मॅपमुळे पावसाचं चित्र दिसून येतं. मॅपवर दिसणारा लाल रंग निम्म्या देशावर दुष्काळाचं संकट असल्याचं दर्शवत आहे. सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस दाखवणाऱ्या या लाल रंगानं निम्मा देश व्यापला आहे.

देशात मान्सून दाखल होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीही निम्मा देश चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदाच्या पावसाळ्यात देशातील 350 जिल्ह्यात सरासरीच्या कमी पाऊस पडला आहे. या कमी पावसामुळे बऱ्याच भागात अवघा खरीप हंगामच संकटात आला आहे. त्याचा शेतीच्या उत्पन्नावरंही परिणाम होणार आहे.

निम्मा देश दुष्काळाच्या छायेत

        जिल्हे             सरासरीच्या तुलनेत पाऊस

  • ७१                ६० ते ९९ टक्के कमी पाऊस
  • २८०              २० ते ५९ टक्के कमी पाऊस
  • ३२                 ६० टक्क्यापेक्षा जास्त पाऊस
  • ८२                २० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस

कमी पावसाचं सर्वात मोठं संकट देशातील शेतकऱ्यांसमोर आहे. कारण हा कमी पडलेला पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतोय.

हवामान विभागाचे देशभरात 36 विभाग आहेत, यंदाच्या पावसाळ्यात या 36 विभागांपैकी अवघ्या दोनच विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यंदा हवामान विभागाच्या तब्बल 34 विभागात पावसाची तूट आहे.

1 जून ते 15 जुलैपर्यंत देशातील 44 टक्के भागात सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट आहे. भारतीय हवामान विभागाची ही आकडेवारी नक्कीच चिंता वाढवणारी आहे. म्हणजे निम्म्या देशात पावसाची तूट ही दुष्काळाची चाहूल तर नाही ना? अशी भीतीही आता व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *