भुलीचं प्रमाण जास्त झाल्याचा आरोप, लातुरात रुग्ण दगावला

लातुरात डॉक्टरांकडून भुलीचं प्रमाण जास्त झाल्याने लातुरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. किरकोळ फ्रॅक्चरसाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णाला जास्त भूल दिल्याने रुग्णाला जीवाल मुकावे लागले आहे.

भुलीचं प्रमाण जास्त झाल्याचा आरोप, लातुरात रुग्ण दगावला
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 7:01 PM

लातुर : लातुरात डॉक्टरांकडून भुलीचं प्रमाण जास्त झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. किरकोळ फ्रॅक्चरसाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णाला जास्त भूल दिल्याने रुग्णाला जीवाला मुकावे लागले आहे.  मात्र तीन दिवसांनंतरही डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. (Due to High level Anaesthesia Patient Death In latur)

लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथल्या रेवती गावकरे या 27 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आपल्या जीवाला मुकावे लागला असल्याचा गंभीर आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. भूल तज्ञाच्या छोट्याश्या चुकीमुळे रेवतीला असा दुर्दैवी मृत्यू आला आहे. यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

रेवतीला हाताच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने लातूरच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आपल्या-आई वडिलांसोबत स्वतः दवाखान्यात गेलेल्या रेवती यांना डॉक्टरांनी छोटंसं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. निसटलेल्या हाडाला पूर्ववत करण्यासाठी हि शस्त्रक्रिया गरजेची असल्याची डॉक्टरांनी रेवती यांना सांगितले. शस्त्रक्रिया करताना त्यांना भूल इंजेक्शन दिले गेले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र चार-पाच तास झाले तरी रेवती ह्या शुद्धीवर आल्याच नाहीत.

रुग्ण शुद्धीवर येत नसल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारायला सुरुवात केली. डॉक्टर मात्र रुग्ण लवकरच शुद्धीवर येईल असं सांगत राहिले. अखेर 12 तास उलटल्यानंतर डॉक्टरांनी अ‌ॅम्ब्युलन्स मागवून स्वतःच हा रुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवला. मात्र तिथे हा रुग्ण केव्हाच मृत झालेला आहे. त्याला भरती करता येणार नाही असे सांगण्यात आले.

भूल तज्ज्ञाच्या छोट्याश्या चुकीमुळे रेवतीला असा दुर्दैवी मृत्यू आला आहे. तिची दोन मुले आईला मुकली आहेत. आता या प्रकरणी रेवतीच्या वडिलांनी लातूरच्या एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र या घटनेला तीन दिवस उलटले तरी डॉक्टरांवर गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस ठाण्याचे अधिकारी आजारी असल्याने दिरंगाई होत असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे. (Due to High level Anaesthesia Patient Death In latur)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.