घरात जेवढे टॉयलेट, तेवढ्याच लोकांचे गृहविलगीकरण; ‘या’ जिल्ह्यात नवी नियमावली !

झोपडपट्टीमधील नागरिकांना होमक्वॉरन्टाईन ठेवता येणार नाही, असे सुद्धा सांगण्यात आले आहे. (solapur corona patient quarantine guidelines)

घरात जेवढे टॉयलेट, तेवढ्याच लोकांचे गृहविलगीकरण; 'या' जिल्ह्यात नवी नियमावली !
CORONA AND QUARANTINE
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 4:35 PM

सोलापूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक कडक निर्बंध लागू करुनसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसत नाहीये. सध्या विविध जिल्ह्यांत आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका क्षेत्रात नवे कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहेत. सोलपूरमध्ये घरामध्ये जेवढे टॉयलेट असतील तेवढ्याच लोकांना गृहविलगीकरणात ठेवताय येईल, असे या नव्या आदेशात सांगण्यात आले आहे. (due to increase in Corona patient Solapur Municipal Corporation issues new guidelines for home quarantine)

नवे नियम कोणते ?

कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे सोलपूर महापालिकेत कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत .या नियमांतर्गत गर्दी करणे, राज्य सरकारने दिलेल्या सूचना पाळणे, तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे असे सांगितले जात आहे. एवढे सारे नियम असूनसुद्धा येथे कोरोना संसर्गाची साखळी तुटताना दिसत नाहीये. हीच गोष्ट लक्षात घेऊन विलगीकरणासंदर्भात सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवे आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार घरामध्ये जेवढे टॉयलेट असतील तेवढ्याच लोकांना होम क्वॉरन्टाईन ठेवता येणार आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना होम क्वॉरन्टाईन होता येणार नाहीये. त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन व्हायचे नसेल तर हॉटेल क्वॉरन्टाईन होण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

राज्यात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन ?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. बेड्स, औषधी, ऑक्सिजनची कमी यामुळे सध्या सर्व स्तरामध्ये घबराट आहे. या कारणामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (10 एप्रिल) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सूतोवाच केले.

रेमेडेसिव्हीरच्या पुरवठ्यासाठी सात जणांची समिती

दरम्यान, विलगीकरणासोबतच रेमेडेसिव्हीर इंजेक्शन पुरवठ्यासंदर्भातसुद्धा सोलापूर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यासह सोलापुरातसुद्धा रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या कारणामुळे कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यावर उपाय तसेच रेमेडेसिव्हीरचा नियमित पुरवठा व्हावा म्हणून सोलापूर प्रशासनाने एकूण सात जणांची समिती नेमली आहे. या समितीकडून इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत ठेवणे, पुरवठादारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे हे काम केले जाईल. प्रांताधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही सात जणांची समिती नेमण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : राज्यात लॉकडाऊन लागेल का, लागला तर कधीपासून लागेल? आरोग्यमंत्री म्हणतात….

LIVE | वाशीतील रिअल टेकपार्क इमारतीच्या 14 वा मजल्यावर आग

‘आंबे खाल्ल्यावर मुलं होतात छाप विधानं करणाऱ्यांनी संकटाच्या काळात दिशाभूल करु नये, अन्यथा….’

(due to increase in Corona patient Solapur Municipal Corporation issues new guidelines for home quarantine)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.