दुर्गा मूर्ती उंचीवर मर्यादा, शासनाच्या परिपत्रकाचा मूर्तिकारांना आर्थिक फटका

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना दुर्गा मूर्तींच्या उंचीवर 4 फुटांची मर्यादा आणली. याचा फटका वाशिम जिल्ह्यातील मूर्तिकारांना बसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.

दुर्गा मूर्ती उंचीवर मर्यादा, शासनाच्या परिपत्रकाचा मूर्तिकारांना आर्थिक फटका
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 12:06 AM

वाशिम : नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना दुर्गा मूर्तींच्या उंचीवर4 फुटांची मर्यादा आणली. राज्य शासनाने नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत परिपत्रक काढले. याचा फटका वाशिम जिल्ह्यातील मूर्तिकारांना बसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. (Durga idol makers faces economic problem after circular of Maharashtra govt)

कोरोना विषाणूमुळे यावर्षीच्या उत्सवात सार्वजनिक रित्या स्थापन करण्यात येणाऱ्या दुर्गा मूर्तींची उंची 4 फुटा पेक्षा जास्त नसावी अशी अट घालण्यात आलीय. या निर्णयामुळे जिल्ह्यातील मूर्तीकारांजवळ असलेल्या दोन हजार ते तीन हजारांपेक्षा अधिक मूर्ती पडून राहणार आहेत.यामुळे  जिल्ह्यातील मूर्तिकारांवर आर्थिक संकट ओढवणार असून त्यांच्या उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवाच्या किमान 4 महिने आधी पासून मूर्तिकारांनी मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मूर्तिकारांचे काम अंतीम टप्प्यात आले असताना मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणणारे परिपत्रक शासनाने काढले आहे. यामुळे मूर्तिकारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. पुढील वर्षापासून पी.ओ.पी बनावटीच्या मुर्तीवर बंदी असल्याने यंदा बनविलेल्या मूर्तींचे काय करावे?, असा प्रश्न निर्माण झाल्याने परीपत्रकाबाबत फेरविचार व्हावा,अन्यथा शासनाने मूर्तिकारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

मराठवाडा आणि विदर्भातून दरवर्षी गणपती व दुर्गा मुर्तींची मोठया प्रमाणात मागणी व्हायची. यावर्षी एकाही मुर्तीची मागणी झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लहान मृर्ती वापरायचे बंधन घातल्याने मंडळांनी वाशिमकडे पाठ फिरवली आहे.

वाशिम शहरातील प्रसिध्द मुर्तीकार सुरेश जावळे आणि रमेश चिल्होरे हे गणपती व दुर्गादेवीच्या मूर्ती बनवण्याचे काम वर्षभर करतात. वाशिमच्या बालाजी कुस्ती मैदान येथे त्यांचा मोठा कारखाना आहे. ऐन वेळी गणेशोत्सवामध्ये व आता नवदुर्गा उत्सव तोंडावर आल्यावर मोठ्या मुर्तींना परवानगी नसल्याने मोठ्या मुर्तींचे काय करायचे? असा प्रश्न मुर्तीकारांसमोर पडला आहे.

कोरोना आणि शासनाच्या मुर्तीच्या उंचीच्या निर्बंधामुळे कुभांर समाजातील मुर्तीकार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँक व फायनान्स कंपनीकडून कर्ज व उधारीवर भांडवल उभे केले होते. चार फुटा पेक्षा जास्त उंचीच्या 500 ते 600  दुर्गादेवी मूर्ती तयार आहेत.परंतु, या मूर्तींची विक्री होणार नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे आणि उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाल्याचे सुरेश जावळेंनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Ganeshotsav 2020 | मुंबईत दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन, मूर्ती संकलन वाहन

Nagpur Ganeshotsav | नागपुरात छोट्या गणेशमूर्तींना अधिक मागणी, बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची लगबग

(Durga idol makers faces economic problem after circular of Maharashtra govt)

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.