भाषणावेळी भाजपच्या प्रचाराची रिक्षा आली, अजित पवार म्हणाले, बावचळून जाशील

बारामती: बारामती लोकसभा  मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज बारामती तालुक्यात माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. माळेगावात दुपारी अजित पवारांची  सभा  सुरू होती. ही सभा रस्त्यालगतच सुरु होती. सभा ऐन रंगात असताना अचानक रस्त्यावरुन भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या दोन गाड्या एकामागून एक आल्या. या गाड्यातील स्पीकरमधून भाजपाचा जोरदार प्रचार […]

भाषणावेळी भाजपच्या प्रचाराची रिक्षा आली, अजित पवार म्हणाले, बावचळून जाशील
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बारामती: बारामती लोकसभा  मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज बारामती तालुक्यात माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. माळेगावात दुपारी अजित पवारांची  सभा  सुरू होती. ही सभा रस्त्यालगतच सुरु होती. सभा ऐन रंगात असताना अचानक रस्त्यावरुन भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या दोन गाड्या एकामागून एक आल्या.

या गाड्यातील स्पीकरमधून भाजपाचा जोरदार प्रचार सुरु होता. त्यामुळं रस्त्यालगतच सुरू असलेल्या सभेतील अजित पवारांच्या भाषणाला अडथळा आला.  त्यावेळी अजित पवारांना काही वेळ आपले भाषण थांबवावे लागले.  पण अशा परिस्थितीवर न बोलतील ते अजित पवार कसले?

त्यांनीही लगेच समयसूचकता दाखवत आपल्या खास शैलीत भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार म्हणाले ” अजित पवार काय म्हणतायेत हे ऐकायला ते आलेत.. आरं.. अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशील. माईकवर पण तू सांगशील  आता ती (कमळाचं नाव न घेता ) नको  घड्याळ घड्याळ घड्याळ…. एवढा बावचाळून जाशील.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.