पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, गुजरातही हादरलं

पालघर : डहाणू तलासरी परिसर आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. याठिकाणी आतापर्यंच्या सर्वाधिक क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज जे भूकंपाचे धक्के जाणवले ते 4.3 मॅग्निट्यूडचे आहेत. या परिसरात मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. डहाणू तलासरी …

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, गुजरातही हादरलं

पालघर : डहाणू तलासरी परिसर आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. याठिकाणी आतापर्यंच्या सर्वाधिक क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज जे भूकंपाचे धक्के जाणवले ते 4.3 मॅग्निट्यूडचे आहेत. या परिसरात मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे.

डहाणू तलासरी भागात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून एका पाठोपाठ एक सौम्य, मध्यम स्वरुपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या एक तारखेला जवळजवळ 16 भूकंपाचे धक्के येथे जाणवले होते. त्यातील 6 भूकंपाच्या धक्क्याची क्षमता 3.0 मॅग्निट्यूड होती. तर सर्वाधिक 4.1 मॅग्निट्यूड क्षमतेच्या भूकंपाची नोंदही झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला या ठिकाणी पुन्हा जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

विशेष म्हणजे, फेब्रुवारीच्या एक तारखेला जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले, तो दिवसही शुक्रवार होता आणि पुन्हा एक महिन्यानंतर म्हणजेच एक मार्चला शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे शुक्रवार हा भूकंपवार ठरु पाहत आहे.

शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेपासून जवळ-जवळ सहा मध्यम स्वरुपाचे धक्के बसले. यामध्ये 11 वाजून 14 मिनिटांनी आतापर्यंतचा सर्वाधिक क्षमतेचा 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात जाणवला. या भूकंपाच्या तीव्रतेच्या नोंदीनुसार, गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, वापी तसेच केंद्रशासित प्रदेशातील सेलवासपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. तसेच, पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, बोईसर, केळवे, सफाळे, विक्रमगड, जव्हार येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपाचा विस्तार वाढीस लागल्याचे जाणवू लागले आहे.

एक फेब्रुवारीला शुक्रवारी जवळजवळ 16 भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यातील 6 भूकंपाची क्षमता 3.0 मॅग्निट्यूड इतकी होती. तर 4.1 मॅग्निट्यूडच्या सर्वाधिक क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *