Eknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा, खडसे भाजपच्या बैठकीला, ठाकरे सरकारला घेरण्यासाठी मार्गदर्शन

एकनाथ खडसे यांनी भाजप राज्यकार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली. ठाकरे सरकारला घेरण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.(Eknath Khadse attend bjp meeting)

Eknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा, खडसे भाजपच्या बैठकीला, ठाकरे सरकारला घेरण्यासाठी मार्गदर्शन

जळगाव: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते. खडसेंनी बैठकीत आगामी निवडणुका, कोरोना, दुष्काळ यामुद्द्यांवर ठाकरे सरकारला घेरण्याविषयी मार्गदर्शन केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही बैठक घेण्यात आली. (Eknath Khadse attend online meeting of BJP state working committee)

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपचे जेष्ठ नेते, आमदार, खासदार आदी  नेते  बैठकीस उपस्थित होते.

राज्य सरकारला दणाणून सोडण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्याविषयी एकनाथ खडसेंनी बैठकीत मार्गदर्शन केले. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका याविषयी खडसेंनी चर्चा केली. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्याविषयी चर्चा करण्यात आली असून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, दुष्काळ, कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि पक्ष संघटन याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या:

Ravindra Patil | एकनाथ खडसेंचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील- रविंद्र पाटील

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा

(Eknath Khadse attend online meeting of bjp state working committee)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *