कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे हे आगामी काळात दिसेलच; खडसेंचा महाजनांवर पलटवार

पक्षातील कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये म्हणून असं विधान करावं लागतं अशी प्रतिक्रिया देत आगामी काळात राष्ट्रवादी व भाजपमधील सत्ता संघर्षाचे संकेत एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे हे आगामी काळात दिसेलच; खडसेंचा महाजनांवर पलटवार
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 10:02 PM

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कोणताही नेता भाजपाला सोडून जाणार नाही असं मत गिरीश महाजन यांनी काल जळगावी व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे हे आगामी काळात दिसेलच. पक्षातील कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये म्हणून असं विधान करावं लागतं अशी प्रतिक्रिया देत आगामी काळात राष्ट्रवादी व भाजपमधील सत्ता संघर्षाचे संकेत एकनाथ खडसे यांनी दिले आहे. (eknath khadse criticized on bjp leader girish mahajan )

तर यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले आहेत. पद मिळालं तरी काम करणार आहे आणि नाही मिळाले तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे भाजपा आमदार गिरीश महाजन म्हणाले होते. जळगाव जिल्हा भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. भाजपा हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असल्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका मांडली होती. त्यावर खडसेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

इतर बातम्या – 

राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही, दिली तर आनंदच आहे: एकनाथ खडसे
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रेल्वे टेंडरच्या नावे गंडा घालणाऱ्या गँगचा पर्दाफाश

(eknath khadse criticized on bjp leader girish mahajan )

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.